स्टेटस अपडेट कसे हटवावे
तुम्ही WhatsApp मधील स्टेटस अपडेट हटवू शकता.
स्टेटस अपडेट हटवण्यासाठी:
- WhatsApp उघडा आणि स्टेटस वर टॅप करा.
- माझे स्टेटस वर टॅप करा.
- त्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील:
- तुम्हाला जे स्टेटस अपडेट हटवायचे आहे त्याच्या बाजूला असलेल्या अधिक
वर टॅप करा. त्यानंतर, हटवा > हटवा यावर टॅप करा. - एकाहून अधिक स्टेटस अपडेट्स हटवायची असतील तर, हटवायच्या असलेल्या स्टेटस अपडेट्सवर टॅप करून धरून ठेवा आणि त्यानंतर, हटवा
> हटवा वर टॅप करा.