Android फिंगरप्रिंट लॉक कसे वापरायचे
गोपनीयतेतून अधिक सुरक्षा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर WhatsApp उघडण्यासाठी 'फिंगरप्रिंट लॉक' या फीचरचा वापर करू शकता. हे फीचर सुरू वर सेट केलेले असते तेव्हा ॲप ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट वापरावे लागेल.
Android फिंगरप्रिंट लॉक सुरु करण्यासाठी:
- WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
> सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर टॅप करा. - खाली स्क्रोल करा आणि फिंगरप्रिंट लॉक वर टॅप करा.
- फिंगरप्रिंट वापरून अनलॉक करा हे सुरू वर सेट करा.
- तुमचे फिंगरप्रिंट कन्फर्म करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सरला स्पर्श करा.
- फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाची सूचना येण्याआधी किती काळ जाऊ द्यावा हे तुम्ही निवडू शकता.
- नवीन मेसेजच्या नोटिफिकेशन्स मध्ये तुम्हाला त्यामध्ये काय मजकूर आहे हे पाहायचे असेल तर नोटिफिकेशन्समध्ये मजकूर दाखवा हे सुरू वर सेट करा.
फिंगरप्रिंट लॉक बंद करण्यासाठी:
- WhatsApp उघडा आणि अधिक पर्याय
> सेटिंग्ज > खाते > गोपनीयता यावर टॅप करा. - खाली स्क्रोल करा आणि फिंगरप्रिंट लॉक वर टॅप करा.
- फिंगरप्रिंट वापरून अनलॉक करा हे बंद वर सेट करा.
टीप:
फिंगरप्रिंट लॉक हे फीचर केवळ Android 6.0+ ऑपरेटिंग सिस्टीमवर Google फिंगरप्रिंट API ला सपोर्ट करणाऱ्या फिंगरप्रिंट सेन्सरने युक्त Android डिव्हाइसवर उपलब्ध आहे.
या फीचरला Samsung Galaxy S5, Samsung Galaxy Note 4, किंवा Samsung Galaxy Note 8 वर सपोर्ट नाही.
फिंगरप्रिंट लॉक हे फीचर वापरण्यासाठी, तुम्ही ते अगोदर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमधून सुरू करणे आवश्यक आहे.
ॲप लॉक केलेले असले तरी तुम्ही कॉलला उत्तर देऊ शकाल.