संपर्कांना ब्लॉक कसे करावे आणि त्यांची तक्रार कशी नोंदवावी
तुम्हाला काही विशिष्ट संपर्कांकडून मेसेजेस, कॉल्स आलेले नको असतील किंवा त्यांची स्टेटस अपडेट्स दिसायला नको असतील, तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता. ते आक्षेपार्ह मजकूर किंवा स्पॅम पाठवत असतील, तरीदेखील तुम्ही त्यांची तक्रार नोंदवू शकता.
संपर्कास ब्लॉक करण्यासाठी:
- WhatsApp उघडा आणि आणखी पर्याय
> सेटिंग्ज यावर टॅप करा. - खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले संपर्क वर टॅप करा.
- जोडा
वर टॅप करा. - तुम्हाला ज्या संपर्कास ब्लॉक करायचे आहे तो संपर्क शोधा किंवा निवडा.
- जोडा
संपर्कास ब्लॉक करण्याचे आणखी काही मार्ग खालीलप्रमाणे:
- संपर्कासह झालेले चॅट उघडा, त्यानंतर आणखी पर्याय
> आणखी > ब्लॉक करा > ब्लॉक करा यावर किंवा तक्रार नोंदवा आणि ब्लॉक करा यावर टॅप करा. या तक्रार नोंदवली जाईल आणि नंबर ब्लॉक केला जाईल. - संपर्कासोबत झालेले चॅट उघडा आणि संपर्काच्या नावावर टॅप करा. त्यानंतर ब्लॉक करा > ब्लॉक करा वर टॅप करा.
अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करणे
- ज्या अनोळखी फोन नंबरला ब्लॉक करायचे आहे त्या नंबरसोबत WhatsApp मध्ये झालेले चॅट उघडा.
- ब्लॉक करा वर टॅप करा.
- त्यानंतर ब्लॉक करा वर टॅप करा. तुम्ही तक्रार करा व ब्लॉक करा वरही टॅप करू शकता. हे केल्याने त्या फोन नंबरबद्दल तक्रार नोंदवली जाईल व तो संपर्क ब्लॉक होईल.
टीप:
- ब्लॉक केलेले संपर्क यापुढे तुम्हाला कॉल करू शकणार नाहीत किंवा मेसेजेस पाठवू शकणार नाहीत.
- ब्लॉक केलेल्या संपर्कांना तुमचे अखेरचे पाहिलेले, ऑनलाइन आहे, स्टेटस अपडेट्स किंवा तुमच्या प्रोफाइल फोटोमधील बदल दिसणार नाहीत.
- एखाद्या संपर्कास ब्लॉक केल्याने तो तुमच्या संपर्क यादीतून काढला जाणार नाही, तसेच त्या संपर्काच्या फोनमधून तुमचा नंबर काढून टाकला जाणार नाही. एखादा संपर्क हटवण्यासाठी, तुम्ही तो तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमधून हटवणे आवश्यक आहे.
- तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक करत आहात हे त्या संपर्कास कळेल का याबद्दल शंका वाटत असल्यास, कृपया हा लेख पहा.
संपर्कास अनब्लॉक करण्यासाठी:
- WhatsApp मध्ये आणखी पर्याय
> सेटिंग्ज वर टॅप करा. - खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले संपर्क यावर टॅप करा.
- तुम्हाला ज्या संपर्कास अनब्लॉक करायचे आहे त्यावर टॅप करा.
- {contact} ला अनब्लॉक करा वर टॅप करा. आता तुम्ही आणि हा संपर्क एकमेकांना मेसेजेस, कॉल्स आणि स्टेटस अपडेट्स पाठवू शकता आणि मिळवू शकता.
किंवा, तुम्ही ज्या संपर्कास ब्लॉक केले आहे तो संपर्क शोधा > संपर्कावर टॅप करून धरून ठेवा > {contact} ला अनब्लॉक करा वर टॅप करा.
टीप:
- तुम्ही ब्लॉक केलेल्या एखाद्या संपर्कास अनब्लॉक केले, तरी तो संपर्क ब्लॉक असताना त्याने पाठवलेले मेसेजेस, कॉल्स किंवा स्टेटस अपडेट्स तुम्हाला मिळणार नाहीत.
- यापूर्वी तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये सेव्ह केलेला नव्हता अशा संपर्कास किंवा फोन नंबरला तुम्ही अनब्लॉक केले, तरी तुम्ही तो संपर्क किंवा फोन नंबर तुमच्या डिव्हाइसमध्ये रिस्टोअर करू शकणार नाही.
संपर्काची तक्रार नोंदवण्यासाठी
- तुम्हाला ज्यांची तक्रार नोंदवायची आहे त्या संपर्काबरोबर चॅट सुरू करा.
- अधिक पर्याय
> आणखी > तक्रार नोंदवा यावर टॅप करा.- तुम्हाला त्या संपर्काला ब्लॉक करायचे असेल आणि चॅटमधील मेसेजेस हटवायचे असतील, तर चेक बॉक्सवर टॅप करा.
- तक्रार नोंदवा वर टॅप करा.
टीप: तक्रार नोंदवल्यानंतर, तुम्हाला त्या वापरकर्त्याने पाठवलेले सर्वात अलीकडील मेसेजेस आणि या वापरकर्त्यासह झालेल्या तुमच्या अलीकडील संभाषणांची माहिती WhatsApp ला मिळते.
एकदाच पाहता येणाऱ्या फोटो किंवा व्हिडिओची तक्रार नोंदवणे
- एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ उघडा.
- अधिक पर्याय
> संपर्काची तक्रार नोंदवा यावर टॅप करा.
'एकदाच पहा' विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्कांना ब्लॉक आणि अनब्लॉक कसे करावे: iPhone | KaiOS