WhatsApp Messenger वरून WhatsApp Business मध्ये जाणे हे जलद, सोपे आणि विश्वासार्ह आहे. खाते हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्या खात्याचा Google Drive बॅकअप किंवा लोकल बॅकअप घ्यावा असे आम्ही सुचवतो. या लेखामध्ये बॅकअप कसे तयार करावा याबद्दल जाणून घ्या.
- Google Play स्टोअर मधून WhatsApp Messengerअपडेट करा आणि WhatsApp Businessडाउनलोड करा.
- WhatsApp Business उघडा.
- टीप: WhatsApp बिझनेस ॲप सुरू ठेवा आणि खाते हलवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुमचा फोनही सुरू ठेवा.
- WhatsApp Business च्या सेवाशर्ती वाचा. अटी स्वीकारण्यासाठी सहमती द्या आणि पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
- WhatsApp Business तुम्ही WhatsApp Messenger मध्ये वापरत असलेला नंबर आपोआप ओळखते. सुरू ठेवण्यासाठी, तुमचा बिझनेस नंबर असलेल्या पर्यायावर टॅप करा.
- दाखवला जात असलेला नंबर हा तुम्हाला वापरायचा असलेला नंबर नसल्यास, दुसरा नंबर वापरा वर टॅप करा आणि सर्वसाधारण पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
- WhatsApp Business ला तुमचा चॅट इतिहास आणि मीडिया वापरू देण्यासाठी पुढे सुरू ठेवा > अनुमती द्या यावर टॅप करा.
- तुमचा नंबरची पडताळणी करण्यासाठी ६ अंकी एसएमएस कोड एंटर करा.
- तुमचे बिझनेस प्रोफाइल तयार करा आणि पुढे वर टॅप करा.
संबंधित लेख: