तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्या स्टिकर पॅकसमोरील डाउनलोड करा वर टॅप करा. सूचना दिसल्यास, डाउनलोड • {फाइल साइझ} वर टॅप करा.
डाउनलोड पूर्ण झाल्यावर हिरवी बरोबरची खूण दिसेल.
मागे जा वर टॅप करा.
तुम्हाला जे स्टिकर पाठवायचे आहे ते शोधा व त्यावर टॅप करा.
एकदा तुम्ही स्टिकर वर टॅप केले की, ते आपोआप पाठवले जाते.
अधिक पर्याय:
तुम्ही अलीकडे वापरलेली स्टिकर्स पाहण्यासाठी अलीकडील वर टॅप करा.
तुमच्या आवडीची स्टिकर्स पाहण्यासाठी आवडीचे वर टॅप करा.
स्टिकर आवडीचे करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील स्टिकरवर टॅप करा आणि > आवडीचे मध्ये जोडा वर टॅप करा. किंवा, स्टिकर्स > आवडीचे वर टॅप करा. स्टिकरवर टॅप करून होल्ड करा, त्यानंतर जोडा वर टॅप करा.
आवडीचे मधून एखादे स्टिकर हटवण्यासाठी, वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये स्टिकरवर जा > आवडीचे मधून काढून टाका वर टॅप करा. किंवा, इमोजी > स्टिकर्स > आवडीचे वर टॅप करा. स्टिकरवर टॅप करून होल्ड करा, त्यानंतर काढून टाका वर टॅप करा.
आयकॉनवर जे इमोजी दिसत असतात त्यानुसार स्टिकर्सची वर्गवारी केली जाते. स्टिकर कॅटेगरीचा संच पाहण्यासाठी हार्ट बॉक्स वर टॅप करा.
स्टिकरच्या अधिक पर्यायांसाठी जोडा वर टॅप करा. सर्व स्टिकर्स टॅबमध्ये तळापर्यंत स्क्रोल करा आणि त्यानंतर आणखी स्टिकर्स मिळवा वर टॅप करा. हे तुम्हाला 'Google Play स्टोअर' वर घेऊन जाईल, जेथे तुम्ही स्टिकर ॲप्स डाउनलोड करू शकता.
तुम्ही डाउनलोड केलेले विशिष्ट स्टिकर शोधण्यासाठी शोधा वर टॅप करा. तुम्ही मजकूर किंवा इमोजी वापरून स्टिकर्स शोधू शकता.
टीप: जर स्टिकर निर्मात्याने WhatsApp च्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे स्टिकर्सना टॅग केले नसेल तर तुम्ही WhatsApp च्या बाहेर डाउनलोड केलेली स्टिकर्स शोधू शकणार नाही.
स्टिकरचा शोध पूर्णपणे ऑफलाइन चालतो. WhatsApp तुमच्या स्टिकर शोधाच्या वापराची किंवा तुम्ही स्टिकर्स शोधताना वापरलेल्या कीवर्ड्सची माहिती गोळा करत नाही.
तुम्ही डाउनलोड केलेली स्टिकर पॅक्स पाहण्यासाठी, जोडा > माझी स्टिकर्स यावर टॅप करा.
तुम्हाला विशिष्ट स्टिकर पॅक हटवायचे असल्यास, हटवा > हटवा वर टॅप करा. *तुमची स्टिकर पॅक्स पुन्हा क्रमाने लावण्यासाठी, स्टिकर पॅकच्या शेजारी असलेल्या पुन्हा क्रमाने लावा चिन्हावर टॅप करून ड्रॅग करा.
स्टिकर पॅक्स अपडेट करण्यासाठी, हिरवा बिंदू दिसेल तेव्हा जोडा वर टॅप करा. सर्व स्टिकर्स टॅबमध्ये जा आणि जे स्टिकर पॅक अपडेट करायचे आहे त्याच्यासमोरील अपडेट करा वर टॅप करा. सूचना दिसल्यास, अपडेट करा • {फाइल साइझ} वर टॅप करा.
अपडेट पूर्ण झाल्यावर हिरवी बरोबरची खूण दिसेल.
WhatsApp च्या नवीन आवृत्त्यांवर स्टिकर्स उपलब्ध आहेत. स्टिकर्स न आढळल्यास, तुमच्या फोनच्या ॲप्लिकेशन स्टोअरवरून तुमचे WhatsApp नवीन आवृत्तीवर अपडेट केले असल्याची खात्री करून घ्या.