'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद कसे करावे
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करून तुम्ही WhatsApp वर नाहीसे होणारे मेसेजेस पाठवू शकता. या फीचरअंतर्गत तुम्ही मेसेजेस २४ तासांनी, ७ दिवसांनी किंवा ९० दिवसांनी नाहीसे होण्याचा पर्याय निवडू शकता. हे फीचर सुरू केल्यानंतर, चॅटमध्ये पाठवलेले नवीन मेसेजेस तुम्ही निवडलेल्या कालावधीनंतर नाहीसे होतील. तुमची सर्वात अलीकडील निवड ही चॅटमधील नवीन मेसेजेसना लागू होते. या सेटिंगचा तुम्ही ते सेटिंग सुरू करण्याआधी पाठवलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या मेसेजेसवर परिणाम होत नाही.
सुरुवात करण्यासाठी WhatsApp उघडा.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करणे
वैयक्तिक चॅटमध्ये ज्या दोन व्यक्तींमध्ये चॅट सुरू आहे त्यापैकी कोणीही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करू शकते. हे फीचर सुरू केल्यानंतर, चॅटमधील नवीन मेसेजेस तुम्ही निवडलेल्या कालावधीनंतर नाहीसे होतील.
- WhatsApp चॅट उघडा.
- संपर्काच्या नावावर टॅप करा.
- एक्स्पायर होणारे मेसेजेस वर टॅप करा.
- सूचना दिसल्यास, पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
- २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवस निवडा.
'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर बंद करणे
ज्या दोन व्यक्तींमध्ये चॅट सुरू आहे त्यापैकी कोणीही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर कधीही बंद करू शकते. हे फीचर बंद केल्यानंतर, चॅटला पाठवलेले नवीन मेसेजेस नाहीसे होणार नाहीत.
- WhatsApp चॅट उघडा.
- संपर्काच्या नावावर टॅप करा.
- एक्स्पायर होणारे मेसेजेस वर टॅप करा.
- सूचना दिसल्यावर, पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
- बंद करा हा पर्याय निवडा.
संबंधित लेख:
- 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' याविषयी माहिती
- 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर कसे सुरू किंवा बंद करावे: iPhone | KaiOS | वेब आणि डेस्कटॉप
- ग्रुपमध्ये 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद कसे करावे: Android | iPhone | KaiOS | वेब आणि डेस्कटॉप