मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात
मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लोकेशन, संपर्क किंवा Messenger रूम्स च्या लिंक्स शेअर करणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- अटॅच करा
वर टॅप करा. त्यानंतर पुढील पर्याय उपलब्ध असतील:- तुमच्या फोनमधील डॉक्युमेंट्स निवडण्यासाठी डॉक्युमेंट वर टॅप करा.
- तुमच्या कॅमेऱ्यामधून फोटो घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा.
- तुमच्या फोनमध्ये आधीपासून असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी गॅलरी वर टॅप करा. एकापेक्षा अधिक इमेजेस निवडण्यासाठी टॅप करून धरून ठेवा.
- तुमच्या फोनमध्ये आधीपासून असलेल्या ऑडिओ फाइल्स पाठवण्यासाठी ऑडिओ वर टॅप करा.
- Messenger रूम्स ची लिंक तयार करण्यासाठी आणि ती शेअर करण्यासाठी रूम वर टॅप करा.
- तुमचे लोकेशन किंवा जवळपासचे ठिकाण पाठवण्यासाठी लोकेशन पाठवा वर टॅप करा.
- WhatsApp वरून तुमचे तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये असलेले संपर्क पाठवण्यासाठी संपर्क वर टॅप करा.
- तुम्ही फोटो किंवा व्हिडिओला कॅप्शनदेखील जोडू शकता. प्रत्येक फोटोला कॅप्शन देण्यासाठी फोटो एकामागून एक स्वाइप करत कॅप्शन देत चला.
- पाठवा
वर टॅप करा.
टीप: तुम्ही जास्तीत जास्त 100 MB साइझचे डॉक्युमेंट पाठवू शकता. WhatsApp मध्ये डॉक्युमेंट पाठवण्यासाठी ते डॉक्युमेंट तुमच्या फोनमध्ये स्थानिकरीत्या सेव्ह केलेले असणे गरजेचे आहे. किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स हाताळणाऱ्या ॲप्सच्या शेअर मेनू मधील WhatsApp चा पर्याय निवडून डॉक्युमेंट पाठवू शकता. तुम्ही डाउनलोड केलेली डॉक्युमेंट्स WhatsApp च्या डॉक्युमेंट्स फोल्डर WhatsApp/Media/WhatsApp Documents मध्ये आपोआप सेव्ह केली जातात. हे फोल्डर फाइल एक्सप्लोरर ॲपमधून ॲक्सेस करता येऊ शकते.
मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लोकेशन्स किंवा संपर्क फॉरवर्ड करणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- तुम्हाला जो मेसेज पाठवायचा आहे त्यावर टॅप करून होल्ड करा. तुम्ही एकापेक्षा जास्त मेसेजेसही निवडू शकता.
- फॉरवर्ड करा
वर टॅप करा. - तुम्हाला मेसेज ज्या चॅटला फॉरवर्ड करायचा आहे ते चॅट निवडा.
- पाठवा
वर टॅप करा.
मीडिया फाइल्स, डॉक्युमेंट्स, लोकेशन्स किंवा संपर्क फॉरवर्ड केल्यावर तुम्हाला ते पुन्हा अपलोड करावे लागणार नाहीत. तुम्ही फॉरवर्ड केलेले, पण तुम्ही स्वत: तयार न केलेले मेसेजेस "फॉरवर्ड केलेले" या लेबलसह प्रदर्शित केले जातील.
टीप: मीडिया फाइलसोबत तिचे कॅप्शन फॉरवर्ड केले जाणार नाही. तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट्सना मेसेजेस फॉरवर्ड करता येणार नाहीत.