तुमच्या WhatsApp वरील चॅटचा दररोज आपोआप बॅकअप घेतला जातो आणि फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह केला जातो. सेटिंगमध्ये सेट असेल, तर तुम्ही तुमच्या WhatsApp चॅटचा बॅकअप Google ड्राइव्ह वर नियमितपणे घेऊ शकता. तुम्ही तुमच्या फोनमधून WhatsApp अनइंस्टॉल करणार असाल, पण तुम्हाला तुमचे मेसेजेस गमवायचे नसतील, तर अनइंस्टॉल करण्याआधी तुमच्या चॅटचे मॅन्युअल बॅकअप घेण्याची खबरदारी घ्या.
चॅटचा बॅकअप घेणे
WhatsApp उघडा > अधिक पर्याय > सेटिंग्ज > चॅट > चॅट बॅकअप > बॅकअप घ्या यावर टॅप करा.
पूर्वीचे चॅट एक्स्पोर्ट करणे
एखाद्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमधील पूर्वीच्या चॅटची कॉपी एक्स्पोर्ट करायची असेल तर तुम्ही ‘चॅट एक्स्पोर्ट करा’ हे फीचर वापरू शकता.
टीप: या फीचरला जर्मनीमध्ये सपोर्ट नाही.
यासाठी ते वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
अधिक पर्याय > अधिक > चॅट एक्स्पोर्ट करा यावर टॅप करा.
मीडियासह एक्स्पोर्ट करायचे किंवा त्याशिवाय, हे निवडा.
तुमचे पूर्वीचे चॅट .txt डॉक्युमेंटच्या स्वरूपात ईमेलला अटॅच केले जाते.
टीप:
तुम्ही मीडियासह चॅट एक्स्पोर्ट करण्याचा पर्याय निवडला, तर तुम्ही मागील काही दिवसांमध्ये पाठवलेला मीडिया अटॅचमेंट म्हणून जोडला जाईल.
तुम्ही मीडियासह चॅट एक्स्पोर्ट करता, तेव्हा तुम्ही मागील काही दिवसांमधील कमाल १०,००० मेसेजेस एक्स्पोर्ट करू शकता. तुम्ही मीडियाशिवाय चॅट एक्स्पोर्ट करता, तेव्हा तुम्ही मागील काही दिवसांमधील कमाल ४०,००० मेसेजेस एक्स्पोर्ट करू शकता. हे ईमेलच्या कमाल साइझवर असलेल्या मर्यादांंमुळे होते.