तुम्ही तुमचा WhatsApp डेटा Google ड्राइव्ह किंवा स्थानिक बॅकअप मधून रिस्टोअर करून एका नवीन फोनवर ट्रान्सफर करू शकता.
Google ड्राइव्ह बॅकअप मधून रिस्टोअर करणे
Google ड्राइव्ह बॅकअप यशस्वीरीत्या रिस्टोअर करण्यासाठी, तुम्ही बॅकअप तयार करण्यासाठी वापरलेलाच फोन नंबर आणि Google खाते वापरणे आवश्यक आहे.
बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी :
WhatsApp अनइंस्टॉल करा आणि परत इंस्टॉल करा.
WhatsApp उघडा आणि तुमच्या फोन नंबरची पडताळणी करा.
सूचित केल्यानंतर, Google ड्राइव्ह वरून तुमचे चॅट आणि मीडिया रिस्टोअर करण्यासाठी रिस्टोअर करा वर टॅप करा.
रिस्टोअर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे वर टॅप करा. सुरुवातीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे चॅट दिसू लागेल.
तुमचे चॅट रिस्टोअर केल्यानंतर, WhatsApp तुमच्या मीडिया फाइल्स रिस्टोअर करण्यास सुरूवात करेल.
तुम्ही Google ड्राइव्ह मधून कोणत्याही प्रकारचा बॅकअप घेण्यापूर्वी WhatsApp इंस्टॉल केलेले असल्यास, तुमच्या स्थानिक बॅकअप फाइलमधून WhatsApp आपोआप रिस्टोअर केले जाईल.
लोकल बॅकअप मधून रिस्टोअर करणे
लोकल बॅकअप वापरायचा असल्यास तर तुम्हाला कॉंप्युटर, फाइल एक्सप्लोरर किंवा SD कार्डच्या मदतीने तुमच्या नवीन फोनवर फाइल्स ट्रान्सफर कराव्या लागतील.
टीप :
तुमचा फोन मागील सात दिवसात तयार होऊ शकतील, साधारण तितक्या लोकल बॅकअप फाइल्स साठवू शकतो.
रोज रात्री २:०० वाजता आपोआप लोकल बॅकअप घेतला जातो आणि तुमच्या फोनमध्ये एका फाइलच्या स्वरूपात सेव्ह केला जातो.
/sdcard/WhatsApp/ या फोल्डरमध्ये तुमचा डेटा स्टोअर नसल्यास तुम्हाला त्याऐवजी "अंतर्गत स्टोरेज" किंवा "मुख्य स्टोरेज" अशी फोल्डर्स दिसतील.
थोडे जुने बॅकअप रिस्टोअर करणे
फारसा नवीन नसलेला लोकल बॅकअप रिस्टोअर करायचा असल्यास, खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:
फाइल मॅनेजर ॲप डाउनलोड करा.
फाइल मॅनेजर ॲप मध्ये sdcard/WhatsApp/Databases येथे जा. तुमचा डेटा SD कार्डवर स्टोअर केलेला नसल्यास तुम्हाला त्याऐवजी "अंतर्गत स्टोरेज" किंवा "मुख्य स्टोरेज" दिसेल.
तुम्हाला जी बॅकअप फाइल रिस्टोअर करायची आहे तिचे नाव msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12 वरून msgstore.db.crypt12 असे करा. तुमचा आधीचा बॅकअप crypt9 किंवा crypt10 सारखा पूर्वीचा प्रोटोकॉल वापरत असण्याची शक्यता आहे. crypt एक्स्टेंशनचा नंबर बदलू नका.