व्हॉइस मेसेजचे पूर्वावलोकन कसे करावे
तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवण्याआधी त्याचा ड्राफ्ट पुन्हा तपासून तुमचे आउटगोइंग मेसेजेस विश्वासाने पाठवू शकता.
व्हॉइस मेसेजचे पूर्वावलोकन करणे
तुम्ही तुमचा व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी तो ऐकू शकता.
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- मायक्रोफोन
वर टॅप करा आणि धरून ठेवा. त्यानंतर, हॅंड्स-फ्री रेकॉर्डिंग लॉक करण्यासाठी वरच्या दिशेने स्लाइड करा. - बोलण्यास सुरुवात करा.
- पूर्ण झाल्यानंतर, थांबवा
वर टॅप करा. - तुमचे रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी प्ले करा
वर टॅप करा. रेकॉर्डिंग कोणत्याही टाइमस्टँपपासून प्ले करण्यासाठी तुम्ही त्या भागावरदेखील टॅप करू शकता. - व्हॉइस मेसेज हटवण्यासाठी ट्रॅश कॅन
वर टॅप करा किंवा तो पाठवण्यासाठी पाठवा वर टॅप करा.