तुमची नोटिफिकेशन्स कशी व्यवस्थापित करावीत
तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्सची प्राधान्ये सहज व्यवस्थापित करता येऊ शकतात.
WhatsApp नोटिफिकेशन सेटिंग्ज बदलणे
WhatsApp उघडा > अधिक पर्याय
तुम्ही मेसेजेस, ग्रुप्स आणि कॉल्स यांसाठी पुढीलपैकी एक पर्याय निवडून नोटिफिकेशन्स बदलू शकता:
- इनकमिंग आणि आउटगोइंग मेसेजेससाठी आवाज सुरू किंवा बंद करू शकता.
- नोटिफिकेशन्सचा आवाज आणि रिंगटोन.
- व्हायब्रेशनचा कालावधी.
- Android 9 आणि त्याहून जुन्या आवृत्तीवर पॉपअप नोटिफिकेशन्स दाखवणे निवडू शकता. हे सेट केल्यास स्क्रीनच्या मध्यभागी नोटिफिकेशन्स दिसतात.
- सपोर्ट असलेल्या फोन्समध्ये नोटिफिकेशन लाइटचा रंग काय असावा हे ठरवू शकता.
- Android 5 आणि त्याहून नवीन आवृत्तीमध्ये उच्च प्राधान्य असलेली नोटिफिकेशन्स निवडू शकता. हे तुमच्या स्क्रीनच्या वरील भागात नोटिफिकेशन्सची झलक दाखवते आणि अशी झलक दिसणे नको असल्यास हे बंद करू शकता.
टीप: उच्च प्राधान्य असलेली नोटिफिकेशन्स बंद केल्यामुळे WhatsApp नोटिफिकेशन्स तुमच्या स्क्रीनच्या तळाशी दिसतील.
तुम्हाला तुमची नोटिफिकेशन्स सेटिंग्ज रिसेट करायची असल्यास, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स > अधिक पर्याय
नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करणे
तुम्ही आवाज, व्हायब्रेशन, पॉपअप आणि लाइट यांसाठी वेगवेगळे पर्याय निवडून तुमची नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करू शकता:
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटच्या नावावर टॅप करा.
- कस्टम नोटिफिकेशन्स वर टॅप करा > कस्टम नोटिफिकेशन्स वापरा हे निवडा.
टीप: ग्रुप कॉल्ससाठी डिफॉल्ट रिंगटोन वापरली जाते. ही रिंगटोन कस्टमाइझ करता येत नाही.
नोटिफिकेशन्स म्यूट करणे
- वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
- वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटच्या नावावर टॅप करा.
- नोटिफिकेशन म्यूट करा वर टॅप करा.
- तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा आणि ठीक आहे वर टॅप करा.
किंवा, नोटिफिकेशन्स दिसणे बंद करण्यासाठी नोटिफिकेशन्स दाखवा ची निवड रद्द करा.
संबंधित लेख:
नोटिफिकेशन्स म्यूट आणि अनम्यूट कशी करावीत: iPhone | वेब आणि डेस्कटॉप | KaiOS