संभाषणाचे ध्वनी कसे व्यवस्थापित करायचे
संभाषण ध्वनी हा तो आवाज असतो जो तुम्ही संदेश पाठविता किंवा तुम्हाला संदेश मिळतो तेव्हा तो वाजतो. तुमचे संभाषण ध्वनी हे मूलभूतरीत्या चालू वर सेट केलेले असतात. संभाषण ध्वनी चा आवाज हा फोनच्या नोटिफिकेशन व्हॉल्यूम म्हणजेच अधिसूचना ध्वनी द्वारे नियंत्रित केला जातो.
हे ध्वनी चालू अथवा बंद करण्यासाठी :
- WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय
> सेटिंग्ज > अधिसूचना > संभाषण ध्वनी हे चालू किंवा बंद वर टॅप करा.
कृपया लक्षात ठेवा की संभाषण ध्वनी सेटिंग्ज समायोजित केल्यावर इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही प्रकारच्या संदेशांसाठी ते सेटिंग लागू होते.