फोटो आणि व्हिडिओ कसे संपादित करावेत
WhatsApp मध्ये इमोजी, मजकूर किंवा फ्रीहॅंड ड्रॉइंग टाकून तुमचे फोटो व व्हिडिओ पर्सनलाइझ करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फोटो आणि व्हिडिओ संपादित करणे
- मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीमधील
कॅमेरा वर टॅप करा. - नवीन फोटो घ्या किंवा व्हिडिओ बनवा अथवा पिकरच्या मदतीने आधीपासून असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
- तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ मध्ये जे काही समाविष्ट करायचे आहे ते निवडा.
स्टिकर किंवा इमोजी जोडणे
स्टिकर > स्टिकरकिंवा इमोजी वर टॅप करा.- जे वापरायचे आहे त्याची निवड करून त्यावर टॅप करा.
- इमोजी किंवा स्टिकर हलवण्यासाठी त्यावर टॅप करून होल्ड करून ठेवा व नंतर ड्रॅग करा.
- इमोजी किंवा स्टिकरचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास इमोजी किंवा स्टिकरचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
- इमोजी किंवा स्टिकर फिरवण्यासाठी, त्यावर पिंच करा आणि ते फिरवा.
मजकूर जोडणे
- स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या मजकूर
वर टॅप करा. - मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला हवा असलेला मजकूर टाइप करा.
- रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
- फॉन्ट प्रकार निवडण्याकरिता, रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट उजवीकडून डावीकडे स्लाइड करा. फॉन्ट प्रकार ठरवून झाल्यावर तुमचे बोट उचला.
- मजकुराचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास मजकुरातील अक्षरांचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
- मजकूर फिरवण्यासाठी त्याच्यावर पिंच करा आणि फिरवा.
ड्रॉ करणे
- स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या
ड्रॉ करा वर टॅप करा. - फ्रीहॅंड ड्रॉइंगसाठी तुमच्या बोटाचा वापर करा.
- रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा. तुम्ही ड्रॉ करत असलेल्या प्रत्येक ओळीसाठी तुम्ही रंग निवडू शकता.
फिल्टर लागू करणे
- फोटो किंवा व्हिडिओ वर वरच्या दिशेने स्वाइप करा.
- फिल्टर निवडा.
व्हिडिओ म्यूट करणे
- तुमच्या व्हिडिओतील ऑडिओ म्यूट करण्यासाठी
म्यूट करावर टॅप करा.