ग्रुप कसे तयार करावेत आणि ग्रुपमध्ये कसे आमंत्रित करावे
ग्रुप तयार करणे
WhatsApp उघडा, अधिक पर्याय > नवीन ग्रुप वर टॅप करा.
किंवा नवीन चॅट > नवीन ग्रुप वर टॅप करा.
तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर, हिरव्या बाणावर टॅप करा.
ग्रुपला नाव द्या. हे नाव ग्रुपमध्ये असलेल्या सर्वांना दिसेल.
ग्रुपच्या नावामध्ये कमाल २५ वर्ण असावेत.
ग्रुपच्या नावामध्ये इमोजी हवा असेल, तर इमोजी वर टॅप करा.
तुम्ही ग्रुप आयकॉनदेखील जोडू शकता. त्यासाठी कॅमेरा चिन्हावर टॅप करा. इमेज जोडण्यासाठी कॅमेरा, गॅलरी किंवा वेबवर शोधा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा. इमेज निवडून सेट केल्यावर, चॅट टॅबमधील ग्रुपच्या नावासमोर ग्रुप आयकॉन दिसू लागेल.
सर्व झाल्यावर हिरव्या बरोबरच्या खुणेवर टॅप करा.
लिंक वापरून ग्रुपमध्ये आमंत्रित करणे
तुम्ही ग्रुप ॲडमीन असाल तर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या लोकांसोबत लिंक शेअर करून त्यांना ग्रुपमध्ये आमंत्रित करू शकता. ग्रुपची आमंत्रण लिंक शेअर करण्यासाठी हे करा:
WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि ग्रुपच्या नावावर टॅप करा.
किंवा, चॅट टॅबवर जाऊन ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
लिंक वापरून आमंत्रित करा वर टॅप करा.
लिंक पाठवण्यासाठी WhatsApp द्वारे लिंक पाठवा, लिंक कॉपी करा किंवा इतर ॲपद्वारे लिंक शेअर करा किंवा क्यु आर कोड या पर्यायांमधून एक पर्याय निवडा.
WhatsApp द्वारे लिंक पाठवत असल्यास, ज्यांना लिंक पाठवायची आहे ते संपर्क शोधा किंवा निवडा. त्यानंतर, पाठवा वर टॅप करा.
ग्रुप ॲडमीनला सध्याची लिंक रद्द करून नवी लिंक तयार करायची असल्यास ते लिंक रीसेट करा चा वापर करू शकतात.
टीप: तुम्ही ज्या WhatsApp वापरकर्त्यांसोबत आमंत्रण लिंक शेअर करत आहात, ते वापरकर्ते त्या लिंकच्या मदतीने ग्रुपमध्ये सामील होतात. त्यामुळे हे फीचर केवळ तुमच्या विश्वासातल्या व्यक्तींसोबतच वापरा. कारण, या व्यक्ती तुमची लिंक इतरांनाही फॉरवर्ड करू शकतात आणि लिंक मिळालेल्या इतर व्यक्तींना ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ग्रुप ॲडमीनच्या संमतीची गरज लागत नाही.