ग्रुपमधून सदस्य काढण्यासाठी आणि नवीन सदस्य समाविष्ट करण्यासाठी तुम्ही ग्रुप ॲडमीन असणे आवश्यक आहे. ग्रुप मध्ये २५६ सदस्य असू शकतात.
सदस्य जोडणे
सदस्यांना जोडण्यासाठी :
- WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता, चॅट टॅब मध्ये जाऊन ग्रुप वर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय
> ग्रुप माहिती वर टॅप करा.
- सदस्य जोडा
वर टॅप करा. - ज्या संपर्कांना ग्रुप मध्ये जोडायचे आहे ते निवडा.
- हे करून झाले की हिरव्या बरोबरच्या
खुणेवर टॅप करा.
सदस्यांना काढणे
सदस्याला ग्रुपमधून काढण्यासाठी :
- WhatsApp ग्रुप चॅट वर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता, चॅट टॅब मध्ये जाऊन ग्रुप वर वर टॅप करून होल्ड करा. त्यानंतर अधिक पर्याय
> ग्रुप माहिती वर टॅप करा.
- ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर टॅप करा.
- {सदस्य} यांना काढा > ठीक आहे वर टॅप करा.