कॅटलॉगमधून प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कशा शेअर कराव्यात
तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत बिझनेसची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस सहज शेअर करू शकता.
वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी
- प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या इमेजच्या बाजूला असलेल्या फॉरवर्ड चिन्हावर टॅप करा.
- तुम्हाला ज्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे ते चॅट शोधा किंवा निवडा.
- पाठवा वर टॅप करा.
एखाद्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करण्यासाठी:
- WhatsApp Business प्रोफाइलवर जा.
- कॅटलॉग समोरील ‘सर्व पहा’ वर टॅप करा.
- तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
- फॉरवर्ड चिन्हावर टॅप करा.
- तुम्हाला ज्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे ते चॅट शोधा किंवा निवडा.
- पाठवा वर टॅप करा.
WhatsApp वेब किंवा डेस्कटॉप वर तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करणे
- WhatsApp Business प्रोफाइलवर जा.
- कॅटलॉग समोरील ‘सर्व पहा’ वर टॅप करा.
- तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर टॅप करा.
- सर्वात वर दिसणाऱ्या ड्रॉप डाउन चिन्हावर टॅप करा.
- प्रॉडक्ट पाठवा वर टॅप करा.
- तुम्हाला ज्या वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करायची आहे ते चॅट शोधा किंवा निवडा.
- पाठवा वर टॅप करा.