द्वी-स्तर पडताळणी हे एक पर्यायी फिचर आहे ज्यामुळे तुमचे खाते अधिक सुरक्षित होते. जेव्हा तुमची द्वी-स्तर पडताळणी सक्षम केलेली असते तेव्हा WhatsApp वर तुमच्या फोन नंबरची पडताळणी करण्यासाठी जेव्हा प्रयत्न केले जातील तेव्हा हे फिचर वापरून सहा आकडी पिन जो तुम्ही स्वतः निर्माण केला आहे तो प्रविष्ट करावा लागेल.
द्वी-स्तर पडताळणी वापरणे सुरु करण्यासाठी हे करा, WhatsApp > सेटिंग्ज > खाते > द्वी-स्तर पडताळणी > सक्षम करा.
हे फिचर सक्षम केल्यानंतर तुम्ही वैकल्पिकरित्या तुमचा ई-मेल ॲड्रेस देखील प्रविष्ट करू शकता. तुम्ही जर तुमचा सहा अंकी पिन कधी विसरलात तर द्वी-स्तर पडताळणी अक्षम करण्यासाठी तसेच तुमचे खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी हा ई-मेल ॲड्रेस WhatsApp ला ई-मेल द्वारे लिंक पाठविण्याची अनुमती देते. हा ई-मेल ॲड्रेस बरोबर आहे का याचे सत्यापन आम्ही करत नाही. आम्ही अशी शिफारस करतो की यदाकदाचित जर तुम्ही तुमचा पिन कोड विसरलात तर तुमच्या खात्यामधून लॉक आऊट न होण्यासाठी तुम्ही तुमचा अचूक ई-मेल ॲड्रेस प्रविष्ट करणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे : द्वी-स्तर पडताळणी अक्षम करण्यासाठीची ई-मेल तुम्हाला आलेली असेल परंतु तुम्ही त्यासाठी विचारणा केली नसेल तर लिंक वर क्लिक करू नका. दुसरे कोणीतरी तुमचा फोन नंबर WhatsApp वर पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही द्वी-स्तर पडताळणी सक्षम केली असेल तर तुम्ही जेव्हा मागील वेळी पिन न वापरता WhatsApp वापरले होते तेव्हापासून ७ दिवसांपर्यंत तो WhatsApp वर परत पडताळून पाहण्याची परवानगी तुम्हाला नाही. याचा अर्थ, जर तुम्ही स्वतःचा पिन विसरलात आणि द्वी-स्तर पडताळणी अक्षम करण्यासाठी ई-मेल ॲड्रेस पुरविला नसेल तर तुम्ही देखील WhatsApp ला परत पडताळू शकणार नाही. या ७ दिवसानंतर तुमच्या नंबरला पिन विना WhatsApp वर पडताळण्याची अनुमती मिळेल परंतु परत पडताळणी करून झाल्यावर सर्व विलंबित संदेश तुम्ही गमावून बसाल - ते सर्व हटविले जातील. तुम्ही अखेरीस वापरल्यापासून ३० दिवसाच्या आत जर तुमचे WhatsApp खाते पिन शिवाय परत पडताळून झाले असेल तर तुमचे खाते हटविले जाईल आणि यशस्वीपणे परत पडताळणी केल्यानंतर नवीन खाते तयार केले जाईल.
टीप : तुमचा पिन कोड तुमच्या लक्षात रहावा म्हणून WhatsApp तुम्हाला तुमचा पिन कोड प्रविष्ट करण्यासाठी वारंवार विचारेल. हे टाळण्याचा कोणताही मार्ग नाही त्यासाठी तुम्हाला द्वी-स्तर पडताळणी फिचरच अक्षम करावे लागेल.