WhatsApp Business काय आहे?

छोट्या बिझनेससाठी तयार करण्यात आलेले WhatsApp Business हे एक Android आणि iPhone ॲप आहे आणि ते निःशुल्क डाउनलोड करता येते. WhatsApp Business हे ॲप ग्राहकांकडून येणाऱ्या मेसेजेसना ऑटोमेट करण्यासाठी, त्यांना वर्गीकृत करण्यासाठी व त्यांना त्वरित उत्तर देण्यासाठी टूल्स पुरवून ग्राहकांसोबत संवाद साधणे सोपे करते. ते मुद्दामच WhatsApp Messenger च्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला Messenger वर सवय आहे त्याप्रमाणे मेसेजेस पाठवणे, फोटो पाठवणे अशाप्रकारेच तुम्ही हे ॲप वापरू शकता.
आम्ही सध्या ॲपमध्ये प्रदान करत असलेली काही फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:
  • बिझनेस प्रोफाइल, या फीचरच्या मदतीने तुमच्या ग्राहकांना तुमचा पत्ता, बिझनेसची माहिती, ईमेल ॲड्रेस आणि वेबसाइट याची माहिती मिळेल.
  • लेबल्स, तुमचे चॅट आणि मेसेजेस संगतवार लावण्यासाठी आणि सहजपणे शोधण्यासाठी वापरता येते.
  • मेसेजिंग टूल्स, हे फीचर ग्राहकांना त्वरित उत्तर पाठवण्यासाठी वापरता येते.
हे ॲप Google प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.
जर तुमचा एखादा बिझनेस नसेल तर, हे नवीन ॲप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे नेहमीचे WhatsApp Messenger खाते वापरून तुमचा मित्रपरिवार, कुटुंबीय आणि बिझनेसेसशी संपर्कात राहू शकता.
हे मदतीचे होते का?
होय