बॅज काउंट पाहू न शकणे
iPhone
सर्वसाधारणपणे, तुमच्या फोनमधील समस्येमुळे WhatsApp आयकॉनवर बॅज काउंट चुकीचा दिसतो. तो रिसेट करण्यासाठी ट्रबलशूटिंगच्या खालील पायऱ्या वापरून पहा:
- एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नवीन WhatsApp मेसेज पाठवण्यास सांगणे: यामुळे मेसेज काउंट आपोआप रिफ्रेश होतो.
- iPhone सेटिंग्जमध्ये बॅजेस सुरू केले आहेत याची खात्री करणे: iPhone च्या सेटिंग्ज वर जा, WhatsApp > नोटिफिकेशन्स वर टॅप करा, बॅजेस सुरू किंवा बंद करा.
- नोटिफिकेशन सेटिंग्ज रिसेट करणे: WhatsApp च्या सेटिंग्ज वर जा, नोटिफिकेशन्स > नोटिफिकेशन सेटिंग्ज रिसेट करा यावर टॅप करा.
- WhatsApp अनइंस्टॉल करणे: ॲपला स्पर्श करा आणि धरून ठेवा. त्यानंतर, ॲप काढून टाका > ॲप हटवा > हटवा यावर टॅप करा. त्यानंतर WhatsApp पुन्हा इंस्टॉल करा.