iCloud वर बॅकअप घेणे

iPhone
तुम्ही iCloud वापरून WhatsApp वरील पूर्वीच्या चॅटचा बॅकअप घेऊ शकता आणि ते रिस्टोअर करू शकता.
टीप:
  • WhatsApp वरील पूर्वीचे चॅट आमच्या सर्व्हरवर स्टोअर केले जात नाही.
  • तुम्ही ज्या मीडिया फाइल्स आणि मेसेजेसचा बॅकअप घेतला आहे, त्यांना WhatsApp च्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभलेले नसते.
  • हटवलेले कोणतेही मेसेजेस आम्ही रिस्टोअर करू शकत नाही.
iCloud वर बॅकअप घेणे

मॅन्युअल बॅकअप
तुम्ही तुमच्या चॅट्सचा मॅन्युअल बॅकअप कधीही घेऊ शकता.
WhatsApp सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप > आताच बॅकअप घ्या यावर जा.
ऑटोमॅटिक बॅकअप
ऑटो बॅकअप वर टॅप करून आणि बॅकअपची वारंवारता निवडून तुम्ही ठरावीक काळाने ऑटोमॅटिक पद्धतीने घेतले जाणारे बॅकअप्स सुरू करू शकता.
याने तुमची चॅट्स व मीडिया फाइल्स यांचा बॅकअप तुमच्या iCloud खात्यावर घेतला जाईल. बॅकअपमध्ये व्हिडिओंचा बॅकअप घ्यायचा आहे की नाही, हे तुम्ही ठरवू शकता. iCloud बॅकअप प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ तुमचे इंटरनेट कनेक्शन आणि बॅकअप साइझ यावर अवलंबून आहे.
आवश्यक गोष्टी
  • तुमचे iCloud वापरण्यासाठी तुम्ही Apple ID वापरून साइन इन करणे आवश्यक आहे.
  • तुमच्या फोनमध्ये iOS 12 किंवा त्यानंतरची आवृत्ती असणे आणि iCloud Drive सुरू असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या iCloud आणि iPhone मध्ये पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. तुमच्या फोनमध्ये आणि तुमच्या iCloud खात्यामध्ये तुमच्या बॅकअपसाठी लागणाऱ्या जागेपेक्षा २.०५ पट अधिक जागा असणे आवश्यक आहे.
तुम्हाला तुमच्या मोबाइल डेटाच्या वापराविषयी चिंता वाटत असेल, तर तुम्ही वाय-फाय कनेक्शन उपलब्ध असतानाच iCloud बॅकअप घ्यावा असे आम्ही सुचवतो.
पूर्वीचे चॅट एक्स्पोर्ट करणे
तुम्हाला एखादे चॅट सेव्ह करायचे असल्यास तुम्ही पूर्वीचे चॅट ईमेलमधून स्वतःला पाठवू शकता.
  1. सेव्ह करायचे आहे ते वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
  2. संपर्काच्या नावावर किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  3. चॅट एक्स्पोर्ट करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला मीडिया फाइल्स अटॅच करायच्या आहेत की मीडिया फाइल्सशिवाय चॅट ईमेल करायचे आहे ते निवडा.
  5. Mail ॲप उघडा. तुम्ही आणखी पर्यायांसाठी अधिक वरदेखील टॅप करू शकता.
  6. तुमचा ईमेल ॲड्रेस एंटर करा आणि पाठवा वर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही