मेसेजेस फॉरवर्ड कसे करावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
‘फॉरवर्ड करणे’ हे फीचर वापरून तुम्ही वैयक्तिक किंवा ग़्रुप चॅटमधून इतर व्यक्तींना किंवा ग्रुप्सना मेसेजेस फॉरवर्ड करू शकता. फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसवर “फॉरवर्ड केलेले” असे लेबल असते. या लेबलमुळे पाठवणाऱ्या व्यक्तीने तो मेसेज स्वत: लिहीला आहे की दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीकडून आलेला मेसेज तुम्हाला पाठवला आहे, हे तुम्हाला समजते.
तुम्ही एखादा मेसेज फॉरवर्ड करता, तेव्हा तो एकावेळी फक्त पाच चॅट्सना फॉरवर्ड करता येतो. एखादा मेसेज आधीच फॉरवर्ड केला गेला असेल, तर तुम्ही तो कमाल एका ग्रुप चॅटला आणि कमाल पाच चॅट्सना फॉरवर्ड करू शकता. एखादा मेसेज अनेक वेळा फॉरवर्ड केला गेला असेल, तर तो एकावेळी फक्त एका चॅटला फॉरवर्ड करता येतो.

मेसेज फॉरवर्ड करणे
 1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये, तुम्हाला जो मेसेज फॉरवर्ड करायचा आहे त्यावर जा त्यानंतर मेनू
  > मेसेज फॉरवर्ड करा वर क्लिक करा.
  • एकापेक्षा जास्त मेसेजेस फॉरवर्ड करण्यासाठी, तुम्ही पहिला मेसेज निवडल्यानंतर आणखी मेसेजेस निवडू शकता किंवा मेनू (
   किंवा
   ) > वर जा आणि मेसेजेस निवडा वर क्लिक करून तुम्हाला जे मेसेजेस फॉरवर्ड करायचे आहेत ते निवडा.
 2. मेसेज फॉरवर्ड करा (
  किंवा
  ) वर क्लिक करा.
 3. तुम्हाला ज्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटला मेसेजेस फॉरवर्ड करायचे आहेत ते चॅट शोधा किंवा निवडा.
 4. पाठवा (
  किंवा
  ) वर क्लिक करा.
टीप: तुम्ही फॉरवर्ड करत आहात ते मेसेजेस तुमचे स्वत:चे नसतील, तर तुम्हाला आणि तो मेसेज पाठवता आहात त्या व्यक्तीला त्या मेसेजवर "फॉरवर्ड केलेले" असे लेबल दिसेल.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही