ब्रॉडकास्ट लिस्ट्स कशा वापराव्यात

Android
iOS
एकाचवेळी अनेक संपर्कांना मेसेज पाठवण्यासाठी तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट्स वापरू शकता.
ब्रॉडकास्ट लिस्ट्स म्हणजे ज्या संपर्कांना प्रत्येक वेळी न निवडता तुम्ही वारंवार मेसेजेस पाठवू शकता अशा प्राप्तकर्त्यांच्या सेव्ह केलेल्या सूची.
टीप: ब्रॉडकास्ट लिस्ट्सना Windows, Mac किंवा वेबवर सपोर्ट नाही.
ब्रॉडकास्ट लिस्टशी संबंधित आवश्यकता

  • ब्रॉडकास्ट लिस्टमधील सर्व संपर्कांनी त्यांच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये तुमचा नंबर सेव्ह केला असल्याची खात्री करा.
  • तुम्ही हव्या तेवढ्या ब्रॉडकास्ट लिस्ट्स तयार करू शकता.
  • तुम्ही प्रत्येक ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये कमाल २५६ संपर्कांना समाविष्ट करू शकता.
ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे
  1. सेटिंग्‍ज > ब्रॉडकास्‍ट लिस्‍ट्स > नवीन लिस्‍ट यावर टॅप करा.
  2. तुम्हाला ज्या संपर्काला जोडायचे आहे, त्या संपर्कास शोधा किंवा निवडा.
  3. संपर्काचे नाव > तयार करा यावर टॅप करा.
प्राप्तकर्त्यांना तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टवरून आलेला मेसेज त्यांच्या चॅट्स टॅबमध्ये त्यांना आलेला वैयक्तिक मेसेज म्हणून प्राप्त होईल. त्या मेसेजला दिलेले प्रत्युत्तरदेखील सर्वसामान्य मेसेजप्रमाणे दिसेल आणि ते ब्रॉडकास्ट लिस्टमधील इतर संपर्कांना पाठवले जाणार नाही.
टीप:
  • ज्या लोकांनी तुमचा नंबर त्यांच्या फोनच्या संपर्कांमध्ये जोडलेला असेल, फक्त त्यांनाच तुमचा ब्रॉडकास्ट मेसेज प्राप्त होईल.
  • एखाद्या व्यक्तीला तुमचे ब्रॉडकास्ट मेसेजेस मिळत नसल्यास, त्यांना त्यांच्या संपर्कांमध्ये तुम्हाला जोडण्यास सांगा.
  • ब्रॉडकास्ट लिस्ट्समुळे एका व्यक्तीला अनेक लोकांपर्यत आपला मेसेज पोहोचवता येतो. तुमच्या प्राप्तकर्त्यांनी ग्रुप संभाषणामध्ये सहभागी व्हावे असे तुम्हाला वाटत असल्यास, याऐवजी ग्रुप चॅट तयार करा.
ब्रॉडकास्ट लिस्ट संपादित करणे
  1. सेटिंग्ज > ब्रॉडकास्ट लिस्ट यावर टॅप करा.
  2. तुम्ही संपादित करू इच्छिता त्या लिस्टच्या शेजारील "i" आयकॉनवर टॅप करा.
  3. लिस्टसंबंधित माहिती स्क्रीनवर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • विद्यमान ब्रॉडकास्ट लिस्टचे नाव > लिस्टचे नाव यावर टॅप करून तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टचे नाव बदलणे. तुमच्‍या ब्रॉडकास्‍ट लिस्‍टचे नवीन नाव एंटर करणे.
    • लिस्ट संपादित करा... वर टॅप करून लिस्टमध्ये प्राप्तकर्ते जोडणे किंवा लिस्टमधून प्राप्तकर्ते काढणे संपर्काच्‍या प्रोफाइल फोटोमध्‍ये "x" > पूर्ण झाले यावर टॅप करा.
ब्रॉडकास्ट लिस्ट हटवणे
  1. सेटिंग्ज > ब्रॉडकास्ट लिस्ट यावर टॅप करा.
  2. जी ब्रॉडकास्ट लिस्ट काढायची आहे तिच्यावर डावीकडे स्वाइप करा.
  3. हटवा वर टॅप करा.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही