ब्रॉडकास्ट लिस्ट्सचा वापर कसा करावा

Android
iPhone
एकाचवेळी अनेक संपर्कांना मेसेज पाठवण्यासाठी ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर वापरा. ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणजे तुम्ही ज्या संपर्कांना वारंवार मेसेजेस पाठवता अशा प्राप्तकर्त्यांची सेव्ह केलेली सूची होय. अशा सर्व संपर्कांना ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये जोडल्याने त्या संपर्कांना प्रत्येक वेळी निवडण्याची आवश्यकता नसते.
ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे
  1. अधिक पर्याय
    > नवीन ब्रॉडकास्ट यावर टॅप करा.
  2. तुम्हाला जो संपर्क जोडायचा आहे, तो शोधा किंवा निवडा.
  3. वर टॅप करा.
तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टमधून पाठवलेला मेसेज प्राप्तकर्त्यांना त्यांच्या चॅट्स टॅबमध्ये सर्वसामान्य मेसेजप्रमाणेच प्राप्त होतो. त्या मेसेजला दिलेले प्रत्युत्तरदेखील सर्वसामान्य मेसेजप्रमाणे दिसेल आणि ते ब्रॉडकास्ट लिस्टमधील इतर संपर्कांना पाठवले जाणार नाही.
टीप: ज्या लोकांनी तुम्हाला त्यांच्या फोनमधील संपर्कांमध्ये जोडले आहे, फक्त त्यांनाच तुमचा ब्रॉडकास्ट मेसेज प्राप्त होईल. एखाद्या व्यक्तीला तुमचे ब्रॉडकास्ट मेसेजेस मिळत नसल्यास, त्यांनी त्यांच्या संपर्कांमध्ये तुमचा नंबर सेव्ह केला आहे याची खात्री करा. ब्रॉडकास्ट लिस्ट्समुळे एका व्यक्तीला अनेक लोकांपर्यत आपला मेसेज पोहोचवता येतो. तुमच्या प्राप्तकर्त्यांनी ग्रुप संभाषणामध्ये सहभागी व्हावे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्टऐवजी ग्रुप चॅट तयार करणे आवश्यक आहे.
ब्रॉडकास्ट लिस्ट संपादित करणे
  1. तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट उघडा.
  2. अधिक पर्याय
    > ब्रॉडकास्ट लिस्टची माहिती यावर टॅप करा.
  3. ब्रॉडकास्ट लिस्टच्या माहिती स्क्रीनवर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • > ब्रॉडकास्ट लिस्टचे नाव बदला यावर टॅप करून तुमच्या ब्रॉडकास्ट लिस्टचे नाव बदला.
    • > प्राप्तकर्ता जोडा... यावर टॅप करून सूचीमध्ये प्राप्तकर्ते जोडा
    • प्राप्तकर्ते संपादित करा > तुम्ही काढू इच्छिता त्या संपर्कांच्या शेजारील "x" >
      यावर टॅप करून प्राप्तकर्त्यांना काढा.
ब्रॉडकास्ट लिस्ट हटवणे
  1. तुम्हाला हटवायची आहे त्या ब्रॉडकास्ट लिस्टवर टॅप करून धरून ठेवा.
  2. > हटवा वर टॅप करा. मीडिया फाइल्स हटवायच्या की नाही, हे तुम्ही निवडू शकता.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही