तुमचे प्रोफाइल कसे संपादित करावे

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही WhatsApp सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा प्रोफाइल फोटो, तुमचे नाव आणि तुमची माहिती संपादित करू शकता.
तुमचा प्रोफाइल फोटो संपादित करणे
  1. अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. वर टॅप करा.
  4. नवीन फोटो घेण्यासाठी कॅमेरा वर, फोनमध्ये आधीपासून असलेला फोटो निवडण्यासाठी गॅलरी वर किंवा अवतार तयार करण्यासाठी अवतार वर टॅप करा.
  5. तुम्ही आधीपासूनच प्रोफाइल फोटो लावलेला असल्यास तो काढून टाकण्यासाठी
    वर टॅप करू शकता.
तुमचे प्रोफाइल नाव संपादित करणे
  1. अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. नावानुसार,
    वर टॅप करा.
  4. तुमचे नवीन नाव एंटर करा.
    • तुमच्या नावामध्ये कमाल २५ कॅरॅक्टर्स असू शकतात.
    • नावामध्ये इमोजी जोडण्यासाठी
      वर टॅप करा.
  5. सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: ग्रुप्समधील ज्या वापरकर्त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये तुमची संपर्क माहिती समाविष्ट नाही, त्यांना तुमचे प्रोफाइल नाव दिसेल.
'माझ्याबद्दल' माहिती संपादित करणे
  1. अधिक पर्याय
    > सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. 'माझ्याबद्दल' नुसार
    वर टॅप करा.
  4. त्यानंतर तुम्ही हे करू शकता:
    • आधीपासून उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
    • तुमची 'माझ्याबद्दल' मधील माहिती कस्टमाइझ करण्यासाठी, सध्या यावर सेट केले आहे यानुसार
      वर टॅप करा. 'माझ्याबद्दल' मध्ये लिहिलेल्या मजकुरात कमाल १३९ कॅरॅक्टर्स असू शकतात.
टीप:
  • 'माझ्याबद्दल' हे फील्ड रिकामे ठेवता येणार नाही.
  • तुमचा प्रोफाइल फोटो आणि 'माझ्याबद्दल' कोण पाहू शकते हे तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमधून नियंत्रित करू शकता.
  • तुम्ही एखाद्या संपर्कास ब्लॉक केले असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या प्रोफाइल फोटोमध्ये किंवा 'माझ्याबद्दल' मधील माहितीमध्ये केलेले बदल दिसणार नाहीत.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही