WhatsApp शी कनेक्ट करता न येणे
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही WhatsApp वर मेसेजेस पाठवू किंवा प्राप्त करू शकत नसल्यास, कदाचित तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल. तुमच्या डिव्हाइसचे इंटरनेट कनेक्शन तपासण्यासाठी:
- तुमच्या मेसेजच्या बाजूला बरोबरच्या खुणेऐवजी घड्याळाचा आयकॉन आहे का हे तपासा. असल्यास, तुमचे मेसेजेस पोहोचत नाही आहेत.
- तुमच्या डिव्हाइसवरील नेटवर्क सिग्नल ब्लिंक होत आहे की रिक्त आहे हे तपासा.
समस्यांचे निराकरण
पुढीलपैकी एक किंवा अधिक उपाय करून कनेक्शनशी संबंधित बऱ्याच समस्यांचे निराकरण करता येते:
डिव्हाइस सेटिंग्ज
- तुमचे डिव्हाइस बंद करा आणि पुन्हा सुरू करा.
- Apple App Store वर उपलब्ध असलेल्या नवीनतम आवृत्तीवर WhatsApp अपडेट करा.
- iPhone सेटिंग्जउघडा आणि विमान मोड सुरू आणि बंद करा.
- iPhone सेटिंग्जउघडा > मोबाइल वर टॅप करा आणि मोबाइल डेटा उघडा.
- iPhone सेटिंग्जउघडा > वाय-फाय वर टॅप करा आणि वाय-फाय बंद आणि सुरू करा.
- तुमची iPhone ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या डिव्हाइससाठी उपलब्ध असलेल्या नवीनतम आवृत्तीवर अपग्रेड किंवा रिस्टोअर करा.
वाय-फाय सेटिंग्ज
- दुसऱ्या एखाद्या वाय-फाय हॉटस्पॉटशी कनेक्ट करून पाहा.
- 'स्लीप फोकस' मोडवर असताना वाय-फाय सुरू राहील याची खात्री करून घ्या.
- वाय-फाय राउटर बंद करून पुन्हा सुरू करा.
- तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा आणि तुमची APN सेटिंग्ज योग्यप्रकारे कॉन्फिगर केली आहेत याची खात्री करून घ्या.
- iPhone सेटिंग्ज> सर्वसाधारण > iPhone ट्रान्सफर किंवा रीसेट करा> रीसेट करा> नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा यावर टॅप करा. तुमचा पासकोड एंटर करा. नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा निवडा. (यामुळे तुम्ही सेव्ह केलेले सर्व वाय-फाय पासवर्ड हटवले जातील).
- तुम्ही नेहमी वापरत नाही असे वाय-फाय वापरत असल्यास आणि त्यामुळे WhatsApp शी कनेक्ट करताना समस्या येत असल्यास, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.
- तुमचे कनेक्शन तुमचे ऑफिस किंवा युनिव्हर्सिटी कॅंपस यांसारख्या व्यवस्थापित केलेल्या वाय-फाय नेटवर्क्सवर नसल्याची खात्री करा. ब्लॉक करण्यासाठी किंवा कनेक्शन मर्यादित करण्यासाठी तुमचे नेटवर्क कॉन्फिगर केले जाऊ शकते.
इतर सेटिंग्ज
- तुम्ही अनलॉक केलेला iPhone वापरत असल्यास किंवा प्री-पेड सिमकार्ड वापरत असल्यास, तुम्ही तुमच्या सिम कार्डकरिता तुमच्या डिव्हाइसची APN सेटिंग्ज योग्यप्रकारे ॲडजस्ट करणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि सूचनांसाठी तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
- WhatsApp हे प्रॉक्सी किंवा VPN सर्व्हिसेससह वापरण्यासाठी डिझाइन केलेले नाही. आम्ही या कॉन्फिगरेशन्सना सपोर्ट करत नाही.
- रोमिंग बंद करा.
संबंधित लेख: