ग्रुपमध्ये सदस्य कसे जोडावेत आणि ग्रुपमधून सदस्य कसे काढावेत
Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही ग्रुपमध्ये सदस्य जोडू शकता किंवा त्यांना ग्रुपमधून काढू शकता. WhatsApp वरील कोणालाही सामील होता यावे यासाठी ग्रुप्स खुले ठेवायचे आहेत की ग्रुप्समध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्व नवीन सहभागी सदस्यांना ॲडमिनची मंजुरी आवश्यक असावी हेदेखील ॲडमिन्स ठरवू शकतात. ग्रुपमध्ये कमाल १०२४ सहभागी सदस्य असू शकतात.
सदस्य जोडणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
- जोडा किंवा लिंक वापरून आमंत्रित करा वर टॅप करा.
- तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
- वर टॅप करा.
- ग्रुपमध्ये नवीन सहभागी सदस्यांना मंजुरी द्या सुरू असेल आणि ग्रुपमध्ये सामील होण्याच्या विनंत्या प्रलंबित असतील, तर ॲडमिनला या विनंत्यांचे पुनरावलोकन करता येते.
सदस्यांना काढणे
- WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय> ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
- किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, अधिक पर्याय
- ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर टॅप करा.
- काढा {participant} > ठीक आहे यावर टॅप करा.
संबंधित लेख: