ग्रुपमध्ये सदस्यांना कसे जोडावे आणि ग्रुपमधून सदस्यांना कसे काढावे

Android
iOS
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
Mac
तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही ग्रुपमध्ये सदस्यांना जोडू शकता किंवा त्यांना ग्रुपमधून काढू शकता. WhatsApp वरील कोणालाही सामील होता यावे यासाठी ग्रुप्स खुले ठेवायचे आहेत की ग्रुप्समध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्व नवीन सदस्यांना ॲडमिनची मंजुरी आवश्यक असावी हेदेखील ॲडमिन्स ठरवू शकतात. ग्रुपमध्ये कमाल १०२४ सदस्य असू शकतात.
सदस्यांना जोडणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर,
   more options
   > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
 2. जोडा किंवा लिंक वापरून आमंत्रित करा वर टॅप करा.
 3. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
 4. check mark
  वर टॅप करा.
 5. ग्रुपमध्ये नवीन सदस्यांना मंजुरी द्या सुरू असेल आणि ग्रुपमध्ये सामील होण्याच्या विनंत्या प्रलंबित असतील, तर ॲडमिनला या विनंत्यांचे पुनरावलोकन करता येते.
सदस्यांना काढणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर,
   more options
   > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
 2. ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर टॅप करा.
 3. {member} यांना काढा > ठीक आहे यावर टॅप करा.
टीप: तुम्ही ग्रुप्समध्ये खूप जास्त संपर्कांना जोडले असेल, तर तुम्हाला ग्रुप्समध्ये आणखी संपर्क जोडण्यासाठी २४ तास प्रतीक्षा करावी लागू शकते.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही