ग्रुप ॲडमिनला कसे ब्लॉक करावे
सध्यातरी ग्रुपला ब्लॉक करण्याची सोय उपलब्ध नाही. परंतु, तुम्ही ग्रुप सोडू शकता आणि ग्रुप ॲडमिनला ब्लॉक करू शकता.
Android, iPhone आणि KaiOS वर तुमची ग्रुप गोपनीयता सेटिंग्ज बदलून तुम्हाला ग्रुप्समध्ये कोण जोडू शकते ते तुम्ही ठरवू शकता.
तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये नसलेल्या ॲडमिनला ब्लॉक करण्यासाठी:
- WhatsApp ग्रुप चॅट सुरू करा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप किंवा क्लिक करा.
- ज्या ॲडमिनला ब्लॉक करायचे आहे त्याच्या फोन नंबरवर टॅप किंवा क्लिक करा.
- सूचना दिसल्यास, मेसेज {phone number} किंवा मेसेज पाठवा वर टॅप किंवा क्लिक करा.
- ॲडमिनसोबतचे रिकामे चॅट उघडेल. सर्वात वर दिसणाऱ्या फोन नंबरवर टॅप किंवा क्लिक करा.
- ब्लॉक करा > ब्लॉक करा यावर टॅप किंवा क्लिक करा.
तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुकमध्ये असलेल्या ॲडमिनला ब्लॉक करण्यासाठी:
Android
- WhatsApp वर जाऊन अधिक पर्याय> सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > ब्लॉक केलेले संपर्क यावर टॅप करा
- वर टॅप करा.
- संपर्क सूचीमधील ॲडमिनच्या नावावर टॅप करा.
iPhone
- WhatsApp > सेटिंग्ज > गोपनीयता > ब्लॉक केलेले यावर जा.
- नवीन जोडा वर टॅप करा.
- संपर्क सूचीमधील ॲडमिनच्या नावावर टॅप करा.
KaiOS
- WhatsApp उघडा > पर्याय > सेटिंग्ज > ठीक आहे वर प्रेस करा.
- खाते > गोपनीयता > उघडा निवडा.
- ब्लॉक केलेले > नवीन जोडा निवडा.
- संपर्क यादीमधील ॲडमिनचे नाव निवडा.
- ब्लॉक करा वर प्रेस करा.
वेब आणि डेस्कटॉप
- तुमच्या WhatsApp मधील चॅट लिस्टच्या वर असलेल्या मेनू (किंवा) वर क्लिक करा.
- सेटिंग्ज > गोपनीयता > ब्लॉक केलेले संपर्क यावर क्लिक करा.
- ब्लॉक करण्याकरिता संपर्क जोडावर क्लिक करा.
- ॲडमिनचे नाव शोधा आणि त्यावर क्लिक करा.
संबंधित लेख:
- ग्रुपची गोपनीयता सेटिंग्ज कशी बदलावीत
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर संपर्कांना ब्लॉक आणि अनब्लॉक कसे करावे: Android | iPhone | KaiOS