कॅटलॉग तयार करणे आणि तो मेन्टेन करणे

Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
तुमच्या ग्राहकांना तुमची नवीनतम प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस यांचा सुलभ ॲक्सेस देण्यासाठी, तुमचा कॅटलॉग अप-टू-डेट ठेवा.
तुमच्या कॅटलॉगमध्ये एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडणे
 1. सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
  • नवीन कॅटलॉग तयार करत असल्यास, नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडा वर टॅप करा.
 2. अधिक आयकॉन किंवा नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडा वर टॅप करा. त्यानंतर, इमेज जोडा वर टॅप करा.
 3. तुमच्या फोटोमधून इमेजेस जोडण्यासाठी फोटो निवडा वर किंवा नवीन इमेजेस घेण्यासाठी फोटो घ्या वर टॅप करा. तुम्ही कमाल १० इमेजेस अपलोड करू शकता.
 4. खालील पर्यायी तपशिलांसह प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचे नाव एंटर करा:
  • किंमत
  • वर्णन
  • वेबसाइटची लिंक
  • प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कोड
 5. सेव्ह करा वर टॅप करा.
टीप: कॅटलॉगमध्ये अपलोड केल्या गेलेल्या प्रत्येक इमेजचे पुनरावलोकन केले जाईल, ज्यामुळे इमेज, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस WhatsApp कॉमर्स पॉलिसी चे पालन करत असल्याचे कन्फर्म केले जाते.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना आपोआप कॅटलॉगवर समाविष्ट केले जाते. मात्र, ते नाकारले गेल्यास इमेजच्या शेजारी लाल रंगाचे उद्गारवाचक चिन्ह दिसेल.
तुमचे प्रॉडक्ट चुकीच्या कारणांमुळे नाकारले गेले आहे असे वाटल्यास, तुम्ही त्या निर्णयावर अपील करू शकता:
 1. त्यासाठी, नाकारल्या गेलेल्या प्रॉडक्टवर टॅप करा.
 2. दुसऱ्या पुनरावलोकनाची विनंती करा वर टॅप करा.
 3. तुम्ही ही विनंती का करत आहात याचे कारण लिहा.
 4. पुढे सुरू ठेवा वर टॅप करा.
 5. तुम्ही WhatsApp कॉमर्स पॉलिसीचे पुनरावलोकन केले असल्यास आणि तुमचे अपील नाकारण्यात आले असल्यास, तिसऱ्या पुनरावलोकच्या विनंतीचे स्पष्टीकरण देणारे उत्तर आम्हाला पाठवा.
ग्राहक कोणती प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस बघू शकतात हे नियंत्रित करणे
टीप: हे फीचर तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
कॅटलॉगमधील प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस लपवणे
 1. सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
 2. प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस > आणखी
  > संपादित करा यावर टॅप करा.
 3. हे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवा सुरू करा.
 4. सेव्ह करा वर टॅप करा.
  किंवा, तुमच्या कॅटलॉग मॅनेजरमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर डाव्या बाजूला स्वाइप करा. त्यानंतर, लपवा > लपवा यावर टॅप करा.
 5. टीप: तरीदेखील लपवलेली प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुमच्या कॅटलॉग मॅनेजरमध्ये त्यांच्या इमेजवर
  या चिन्हासह दिसतात. तुम्ही एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवली असल्यास ते दर्शवणारी टीप प्रॉडक्ट तपशील पेजवर दिसेल.
कॅटलॉगमधील प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस लपवणे बंद करणे
 1. सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
 2. लपवलेले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस > आणखी
  > संपादित करा यावर टॅप करा.
 3. हे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवा बंद करा.
 4. सेव्ह करा वर टॅप करा.
 5. किंवा, तुमच्या कॅटलॉग मॅनेजरमध्ये प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर डाव्या बाजूला स्वाइप करा. त्यानंतर, लपवणे रद्द करा > लपवणे रद्द करा यावर टॅप करा.
तुमच्या कॅटलॉगमधून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हटवणे
 1. सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
 2. प्रॉडक्टवर डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, हटवा > हटवा यावर टॅप करा.
  • किंवा, तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस यापैकी जे हटवायचे आहे, त्याची इमेज निवडा. त्यानंतर, संपादित करा > हटवा > हटवा यावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही