कॅटलॉग तयार करणे आणि तो मेन्टेन करणे
Android
iOS
Web
Android
iOS
Web
तुमच्या ग्राहकांना तुमच्या बिझनेसची नवीनतम प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस यांचा सुलभ ॲक्सेस देण्यासाठी, तुमचा कॅटलॉग अप-टू-डेट ठेवा.
तुमच्या कॅटलॉगमध्ये एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जोडणे
- > सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
- नवीन आयटम जोडा वर टॅप करा.
- फोटो आणि व्हिडिओ जोडा वर टॅप करा.
- तुमच्या डिव्हाइसवरून इमेजेस आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गॅलरी किंवा नवीन इमेजेस अथवा व्हिडिओ घेण्यासाठी कॅमेरा वर टॅप करा. तुम्ही कमाल १० इमेज किंवा व्हिडिओ अपलोड करू शकता आणि व्हिडिओसाठी आकार मर्यादा ५० MB इतकी आहे.
- टीप: व्हिडिओ अपलोड केला जातो, तेव्हा व्हिडिओ थंबनेल इमेज आपोआप तयार केल्या जातात आणि त्या यावेळी संपादित केल्या जाऊ शकत नाहीत.
- खालील पर्यायी तपशिलांसह प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचे नाव एंटर करा:
- किंमत
- विक्री किंमत
- वर्णन
- वेबसाइटची लिंक
- प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कोड
- सेव्ह करणे वर टॅप करा.
टीप: कॅटलॉगमध्ये अपलोड केल्या गेलेल्या प्रत्येक इमेज आणि व्हिडिओचे पुनरावलोकन केले जाते, ज्यामुळे इमेज, व्हिडिओ, प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस WhatsApp Business मेसेजिंग धोरणाचे पालन करत असल्याचे कन्फर्म केले जाते.
प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना आपोआप कॅटलॉगवर समाविष्ट केले जाते. मात्र, ते नाकारले गेल्यास इमेजच्या शेजारी लाल रंगाचे उद्गारवाचक चिन्ह दिसेल.
तुमचे प्रॉडक्ट चुकीच्या कारणांमुळे नाकारले गेले आहे असे वाटल्यास, तुम्ही त्या निर्णयावर अपील करू शकता:
- त्यासाठी, नाकारल्या गेलेल्या प्रॉडक्टवर टॅप करा.
- दुसऱ्या पुनरावलोकनाची विनंती करा वर टॅप करा.
- तुम्ही ही विनंती का करत आहात याचे कारण लिहा.
- सुरू ठेवा वर टॅप करा.
तुम्ही WhatsApp Business मेसेजिंग धोरणाचे पुनरावलोकन केले असल्यास आणि तुमचे अपील नाकारण्यात आले असल्यास, तिसऱ्या पुनरावलोकच्या विनंतीचे स्पष्टीकरण देणारे उत्तर आम्हाला पाठवा.
ग्राहक कोणती प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस शोधू शकतात ते नियंत्रित करणे
टीप: हे फीचर तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
कॅटलॉगमधील प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस लपवणे
- > सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
- तुम्ही अनेक प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस स्वतंत्रपणे किंवा एकाच वेळी लपवू शकता.
- एखादे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवण्यासाठी, त्यावर टॅप करून प्रॉडक्ट तपशील पेज उघडा. त्यानंतर,> लपवा > लपवा यावर टॅप करा.
- अनेक प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस एकाच वेळी लपवण्यासाठी, हिरवी बरोबरची खूण दिसेपर्यंत प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसवर प्रेस करून धरून ठेवा. त्यानंतर तुम्ही लपवू इच्छिता ती इतर प्रॉडक्ट्स > > लपवा यावर टॅप करा.
टीप: तरीदेखील लपवलेली प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुमच्या कॅटलॉग मॅनेजरमध्ये त्यांच्या इमेजवर या चिन्हासह दिसतील. प्रॉडक्ट तपशील पेजवर तुम्ही हे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लपवली आहे हे दर्शवणारी टीप दिसेल.
कॅटलॉगमधील प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस लपवणे बंद करणे
- > सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
- तुम्ही अनेक प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस लपवणे स्वतंत्रपणे किंवा एकाच वेळी बंद करू शकता.
- एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला लपवणे बंद करण्यासाठी, त्यावर टॅप करून प्रॉडक्ट तपशील पेज उघडा. त्यानंतर, > लपवणे बंद करा > लपवणे बंद करा यावर टॅप करा.
- अनेक प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसना लपवणे एकाच वेळी बंद करण्यासाठी, हिरवी बरोबरची खूण दिसेपर्यंत तुम्हाला लपवणे बंद करायचे आहे अशी प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस यापैकी एकावर प्रेस करून होल्ड करा. त्यानंतर, तुम्ही लपवणे बंद करू इच्छिता ती इतर प्रॉडक्ट्स > > लपवणे बंद करा यावर टॅप करा.
तुमच्या कॅटलॉगमधील कलेक्शन्स तयार आणि व्यवस्थापित करणे
ग्राहकांना हवी असलेली प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस शोधणे त्यांच्यासाठी आणखी सोपे करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॅटलॉगमध्ये कलेक्शन्स तयार करू शकता. कलेक्शन्स तयार आणि व्यवस्थापित कशी करावीत याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुमच्या कॅटलॉगमधून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करणे
तुम्ही तुमच्या कॅटलॉगमधील प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची लिंक चॅटमध्ये किंवा WhatsApp मधील तुमच्या स्टेटसवर किंवा तृतीय पक्ष मेसेजिंग ॲपमध्ये शेअर करू शकता. तुमच्या कॅटलॉगमधून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कशी शेअर करावी याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुमच्या कॅटलॉगमधून प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हटवणे
- > सेटिंग्ज> बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
- प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या इमेजवर दीर्घकाळ प्रेस करून ठेवा.
- हटवा आयकॉनवर टॅप करा, त्यानंतर हटवा वर टॅप करा.
किंवा, तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस यापैकी जे हटवायचे आहे, त्याची इमेज निवडा. त्यानंतर, > हटवा > हटवा यावर टॅप करा.