ग्रुप व्हॉइस कॉल कसा करावा

Android
iPhone
तुम्ही WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरत असाल, तर ग्रुप कॉलिंग हे फीचर वापरून WhatsApp ग्रुप व्हॉइस कॉलवर कमाल ३२ सहभागी सदस्यांना सामील होता येते. व्हॉइस कॉलिंग तुमच्या फोनच्या मोबाइल प्लॅनच्या मिनिटांऐवजी फोनमधील इंटरनेट कनेक्शन वापरते. त्यामुळे डेटा शुल्क लागू शकते. तुम्हाला ग्रुप व्हॉइस कॉल येतो, तेव्हा तुम्हाला इनकमिंग WhatsApp ग्रुप व्हॉइस कॉल स्क्रीनवर कॉलवर असलेले सदस्य दिसतील. यादीतील सर्वात पहिला संपर्क हा तुम्ही जोडलेला संपर्क असेल. पूर्वीचे ग्रुप व्हॉइस कॉल्स हे कॉल्स टॅबमध्ये दिसतील. कॉलमधील सहभागी सदस्य पाहण्यासाठी तुम्ही 'पूर्वीचे कॉल्स' वर टॅप करू शकता. तुमच्याकडून मिस झालेला कॉल अद्याप सुरू असल्यास तुम्ही त्या कॉलमध्येही सामील होऊ शकता.
ग्रुप व्हॉइस कॉल करणे
ग्रुप चॅटमधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी:
  1. तुम्हाला ज्या ग्रुपला व्हॉइस कॉल करायचा आहे त्या ग्रुपचे चॅट उघडा.
  • तुमच्या ग्रुपमध्ये ३३ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असल्यास, ग्रुप कॉल
    वर टॅप करा. तुम्हाला ज्या संपर्कांना व्हॉइस कॉलमध्ये जोडायचे आहे ते संपर्क शोधा आणि व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
  • तुमच्या ग्रुपमध्ये ३२ किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्यास, व्हॉइस कॉल
    वर टॅप करा आणि तुमचा निर्णय कन्फर्म करा. फक्त ग्रुप सदस्य सामील होऊ शकतात.
कॉल्स टॅबमधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी:
  1. WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर टॅप करा.
  2. नवीन कॉल
    > नवीन ग्रुप कॉल यावर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या संपर्कांना व्हॉइस कॉलमध्ये जोडायचे आहे ते संपर्क शोधा आणि व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
वैयक्तिक चॅटमधून ग्रुप व्हॉइस कॉल करणे
  1. ज्या संपर्कांना व्हॉइस कॉल करायचा आहे, त्यांपैकी एका संपर्कासोबत वैयक्तिक चॅट सुरू करा.
  2. व्हॉइस कॉल
    वर टॅप करा.
  3. संपर्काने तुमचा कॉल स्वीकारल्यानंतर, उघडा
    > सदस्य जोडा यावर टॅप करा.
  4. तुम्हाला आणखी ज्या संपर्कांना कॉलमध्ये समाविष्ट करायचे आहे ते संपर्क शोधा आणि जोडा वर टॅप करा.
  5. आणखी संपर्कांना समाविष्ट करायचे असल्यास, सदस्य जोडा वर टॅप करा.
ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सहभागी होणे
इनकमिंग ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सहभागी होणे
  1. एखादी व्यक्ती तुम्हाला ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देते, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
  2. तुम्ही सामील होऊ शकत नसल्यास, दुर्लक्ष करा वर टॅप करा. कॉलसंबंधित महितीची स्क्रीन उघडण्यासाठी, इनकमिंग कॉलच्या नोटिफिकेशनवर टॅप करा.
  3. कॉल माहितीच्या स्क्रीनवरून, तुम्ही कॉलमधील सहभागी सदस्य आणि इतर आमंत्रित पाहू शकता.
  4. कॉलमध्ये सामील होण्यासाठी सामील व्हा वर टॅप करा.
  5. कॉलवर असताना, उघडा
    वर टॅप करा आणि कॉल माहितीची स्क्रीन उघडा.
    • कॉलमध्ये आणखी संपर्कांना जोडण्यासाठी सदस्य जोडा वर टॅप करा.
    • आधीपासून आमंत्रित केलेल्या लोकांना नोटिफिकेशन पाठवण्यासाठी रिंग करा वर टॅप करा.
मिस्ड ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये सामील होणे
  1. WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर टॅप करा.
  2. ग्रुप चॅटमधून कॉल सुरू झाल्यास, तुम्ही ते चॅट उघडून आणि सामील व्हा वर टॅप करून कॉलमध्ये सामील होऊ शकता.
  3. कॉल सुरू असल्यास, तुम्हाला सामील व्हायचे आहे त्या कॉलवर टॅप करा. हे केल्यास कॉल माहितीची स्क्रीन उघडेल.
  4. कॉल मेनूमधून, सामील व्हा वर टॅप करा.
दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला म्यूट करणे
तुम्ही ग्रुप कॉलमधील इतर सहभागी सदस्यांना म्यूट करू शकता. तसे करण्यासाठी, सहभागी सदस्याच्या नावावर टॅप करा आणि होल्ड करा. त्यानंतर 'म्यूट करा' वर प्रेस करा. सहभागी सदस्य मायक्रोफोन आयकॉनवर कधीही टॅप करून स्वतःला अनम्यूट करू शकतात. तुम्ही ग्रुप कॉलमधील सहभागी सदस्याच्या टाइलवर टॅप व होल्ड करून त्यांना थेट मेसेज करू शकता.
टीप:
  • ग्रुप व्हॉइस कॉल सुरू असताना, तुम्ही व्हिडिओ कॉलला स्विच करू शकणार नाही.
  • ग्रुप व्हॉइस कॉल सुरू असताना तुम्हाला कोणत्याही संपर्काला काढता येणार नाही. एखाद्या संपर्काने कॉल समाप्त केला तरच तो कॉलमधून डिस्कनेक्ट होईल.
  • तुम्ही ब्लॉक केलेला एखादा संपर्क तुमच्यासोबत ग्रुप व्हॉइस कॉलमध्ये आहे असे होऊ शकते. पण लक्षात घ्या की, तुम्ही ब्लॉक केलेल्या संपर्कास किंवा ज्या संपर्काने तुम्हाला ब्लॉक केले आहे त्या संपर्कास तुम्ही कॉलमध्ये समाविष्ट करू शकणार नाही. तुम्ही ज्या व्यक्तीला ब्लॉक केले आहे ती व्यक्ती कॉलमध्ये असल्यास तुम्ही कॉल इग्नोअर करू शकता.
  • तुम्ही WhatsApp द्वारे आपत्कालीन सेवांचे नंबर्स ‍ॲक्सेस करू शकत नाही. जसे की, भारतामध्ये तुम्ही WhatsApp वरून 100 हा नंबर वापरू शकत नाही. आपत्कालीन कॉल करायचा असल्यास, तुम्ही एखादा पर्यायी मार्ग वापरणे गरजेचे आहे.
  • ग्रुप कॉलिंग या फीचरला डेस्कटॉप किंवा वेबवर सपोर्ट नसल्याने, तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात त्यांना त्यांच्या प्राथमिक डिव्हाइसवर फक्त कॉल प्राप्त होईल.
संबंधित लेख:
  • पुढील प्लॅटफॉर्म्सवर व्हॉइस कॉल कसा करावा: Android | iPhone
  • iPhone वर ग्रुप व्हॉइस कॉल कसा करावा
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही