WhatsApp ची भाषा कशी बदलावी

WhatsApp हे ॲप iPhone वर ४० हून अधिक भाषांमध्ये आणि Android वर तब्बल ६० भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमचा फोन ज्या भाषेवर सेट आहे, WhatsApp त्या भाषेमध्ये दिसते. उदा. तुमच्या फोनची भाषा इंग्रजीवर सेट केलेली असेल, तर WhatsApp इंग्रजीमध्येच दिसेल.
तुमच्या फोनची भाषा बदलणे
  • Android: तुमच्या फोनमध्ये सेटिंग्ज > सिस्टीम > भाषा आणि इनपुट > भाषा येथे जा. तुमचा फोन ज्या भाषेवर सेट करायचा आहे ती भाषा धरून ठेवा आणि वरपर्यंत न्या किंवा भाषा जोडा
    वर टॅप करा.
  • iPhone: iPhone Settings
    > General > Language & Region > iPhone Language येथे जा. तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा आणि Change to {language} वर टॅप करा.
  • KaiOS: ॲप्स मेनूमधील सेटिंग्ज वर प्रेस करा. त्यानंतर, उजवीकडे स्क्रोल करून पर्सलनाइझ करा वर प्रेस करा. त्यानंतर, खालील बाजूस स्क्रोल करून भाषा वर जा आणि भाषा वर प्रेस करा. तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा आणि ठीक आहे वर किंवा निवडा वर प्रेस करा.
पुढील पर्याय काही निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे
तुम्ही Android फोन वापरत असाल, तर तुम्ही WhatsApp मधूनही ॲपची भाषा बदलू शकाल. एक पर्याय म्हणजे, सुरुवातीच्या स्वागत स्क्रीनवरच तुमची भाषा निवडणे. किंवा, तुम्ही आधीपासून WhatsApp वापरत असल्यास:
  1. WhatsApp उघडा.
  2. अधिक पर्याय
    > सेटिंग्ज > ॲपची भाषा यावर टॅप करा.
  3. तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
तुम्हाला हे पर्याय दिसत नसल्यास तुमच्या देशामध्ये या फीचर्सना सपोर्ट नाही असे समजावे.
हे मदतीचे होते का?
होय
नाही