वापरात नसलेली खाती हटविली जाण्याविषयी माहिती
अकारण डेटा साठविणे टाळण्यासाठी आणि आमच्या वापरकर्त्यांचा खाजगीपणा जपण्यासाठी, सुरक्षेच्या हेतूने WhatsApp खाते जर १२० दिवस वापरले गेले नसेल तर ते शक्यतो हटविले जाते. खाते वापरात नसणे याचा अर्थ वापरकर्त्याने WhatsApp शी कनेक्ट केलेले नसते.
खाते सक्रिय असण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे असते. जर वापरकर्त्याने त्यांच्या फोनवर WhatsApp चालू केले असेल परंतु फोन इंटरनेटला कनेक्ट केला नसेल तर खाते निष्क्रिय होते.
खाते हटविण्यापूर्वी वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर स्थानिकरित्या साठवलेला डेटा WhatsApp डिलीट होईपर्यंत तसाच राहील. जेव्हा वापरकर्ता त्याच डिव्हाइसवर WhatsApp परत रजिस्टर करेल तेव्हा तो डेटा आपोआप परत उपलब्ध होईल.
संबंधित लेख :