WhatsApp वापरण्यासाठी लागणाऱ्या किमान वयाबद्दल माहिती

तुम्ही युरोपियन इकॉनॉमिक एरिया (ज्यामध्ये युरोपियन युनियनचा समावेश होतो) मधील देशात आणि अन्य कोणत्याही समाविष्ट केलेल्या देशात किंवा प्रांतामध्ये (ज्यास एकत्रितपणे युरोपियन प्रांत असे संबोधले जाते) राहात असल्यास, WhatsApp साठी नोंदणी करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी तुमचे वय किमान १६ वर्षे (किंवा तुमच्या देशात आवश्यक असलेले वय) असणे आवश्यक आहे.
तुम्ही युरोपियन प्रांतामधील देशाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात राहात असल्यास, WhatsApp साठी नोंदणी करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी तुमचे वय किमान १३ वर्षे (किंवा तुमच्या देशात आवश्यक असलेले वय) असणे आवश्यक आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आमच्या सेवाशर्ती पहा.
टीप:
  • खोट्या माहितीसह खाते तयार करणे हे आमच्या अटींचे उल्लंघन समजले जाते.
  • अल्पवयीन मुला/मुलीच्या वतीने खात्यासाठी नोंदणी करणे हेदेखील आमच्या अटींचे उल्लंघन समजले जाते.
अल्पवयीन मुला/मुलीच्या खात्याची तक्रार करणे
तुमच्या अल्पवयीन मुला/मुलीने WhatsApp खाते तयार केल्यास, तुम्ही त्यांना त्यांचे खाते कसे हटवायचे ते दाखवू शकता. खाते कसे हटवावे हे जाणून घेण्यासाठी मदत केंद्राला भेट द्या.
एखाद्या अल्पवयीन मुला/मुलीच्या खात्याची तक्रार करायची असल्यास, कृपया आम्हाला ईमेल. तुमच्या ईमेलमध्ये कृपया खालील डॉक्युमेंट्स पुरवा आणि संबंधित नसलेली इतर कोणतीही वैयक्तिक माहिती संपादित करा किंवा लपवा:
  • WhatsApp नंबरच्या मालकीचा पुरावा (उदा. तेच नाव असलेले सरकारद्वारे दिलेले ओळखपत्र व फोन बिलाची प्रत)
  • पालकत्वाचा पुरावा (उदा. अल्पवयीन मुला/मुलीचा जन्माचा दाखला किंवा दत्तक प्रमाणपत्र)
  • मुला/मुलीच्या जन्मतारखेचा पुरावा (उदा. अल्पवयीन मुला/मुलीच्या जन्माचा दाखला किंवा दत्तक प्रमाणपत्र)
WhatsApp खाते अल्पवयीन मुला/मुलीचे आहे असे सप्रमाण सिद्ध झाल्यास आम्ही ते खाते त्वरित बंद करू. तुम्हाला या कारवाईबद्दल कन्फर्मेशन मिळणार नाही. वर मागितलेली माहिती पूर्ण आणि योग्य पद्धतीने दिल्यास तक्रारीचे पुनरावलोकन करण्याच्या आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या आमच्या क्षमतेत कमालीची सुधारणा होते.
ज्या खात्याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली आहे ते खाते अल्पवयीन वापरकर्त्याचे आहे असे सिद्ध न झाल्यास आम्ही त्या खात्यावर कारवाई करू शकणार नाही. तुम्ही त्या लहान मुला/मुलीचे पालक नसल्यास, तुम्ही वरील सूचनांचा वापर करून त्या मुला/मुलीच्या पालकांना आमच्याशी संपर्क साधण्यास प्रोत्साहित करावे अशी आम्ही शिफारस करतो.
हे मदतीचे होते का?
होय
नाही