फोटो आणि व्हिडिओ कसे संपादित करावेत

Android
iPhone
WhatsApp मध्ये इमोजी, मजकूर किंवा फ्रीहॅंड ड्रॉइंग टाकून तुमचे फोटो व व्हिडिओ पर्सनलाइझ करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फोटो आणि व्हिडिओ संपादित करणे
 1. मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीमधील
  कॅमेरा वर टॅप करा.
 2. नवीन फोटो घ्या किंवा व्हिडिओ बनवा अथवा पिकरच्या मदतीने आधीपासून असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
 3. तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ मध्ये जे काही समाविष्ट करायचे आहे ते निवडा.
स्टिकर किंवा इमोजी जोडणे
 1. स्टिकर > स्टिकरकिंवा इमोजी वर टॅप करा.
 2. जे वापरायचे आहे त्याची निवड करून त्यावर टॅप करा.
  • इमोजी किंवा स्टिकर हलवण्यासाठी त्यावर टॅप करून होल्ड करून ठेवा व नंतर ड्रॅग करा.
  • इमोजी किंवा स्टिकरचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास इमोजी किंवा स्टिकरचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
  • इमोजी किंवा स्टिकर फिरवण्यासाठी, त्यावर पिंच करा आणि ते फिरवा.
मजकूर जोडणे
 1. स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या मजकूर
  वर टॅप करा.
 2. मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला हवा असलेला मजकूर टाइप करा.
  • रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा.
  • फॉन्ट प्रकार निवडण्याकरिता, रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट उजवीकडून डावीकडे स्लाइड करा. फॉन्ट प्रकार ठरवून झाल्यावर तुमचे बोट उचला.
  • मजकुराचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास मजकुरातील अक्षरांचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
  • मजकूर फिरवण्यासाठी त्याच्यावर पिंच करा आणि फिरवा.
ड्रॉ करणे
 1. स्क्रीनच्या सर्वात वर असलेल्या
  ड्रॉ करा वर टॅप करा.
 2. फ्रीहॅंड ड्रॉइंगसाठी तुमच्या बोटाचा वापर करा.
  • रंग निवडण्यासाठी असलेल्या साधनावर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करून तुम्हाला हवा असलेला रंग निवडा. तुम्ही ड्रॉ करत असलेल्या प्रत्येक ओळीसाठी तुम्ही रंग निवडू शकता.
फिल्टर लागू करणे
 1. फोटो किंवा व्हिडिओ वर वरच्या दिशेने स्वाइप करा.
 2. फिल्टर निवडा.
व्हिडिओ म्यूट करणे
 1. तुमच्या व्हिडिओतील ऑडिओ म्यूट करण्यासाठी
  म्यूट करावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही