फोटो आणि व्हिडिओ कसे संपादित करावेत
Android
iPhone
वेब आणि डेस्कटॉप
WhatsApp मध्ये स्टिकर्स, इमोजी, मजकूर, फ्रीहॅंड ड्रॉइंग तसेच फिल्टर्स टाकून तुमचे फोटो व व्हिडिओ पर्सनलाइझ करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फोटो आणि व्हिडिओ संपादित करणे
नवीन फोटो किंवा व्हिडिओ घेणे
- मजकूर लिहिण्याच्या फील्डमध्ये अटॅच करा> कॅमेरायावर टॅप करा.
- व्हिडिओ किंवा फोटो वर टॅप करा, त्यानंतर नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करा किंवा नवीन फोटो घ्या.
- तुमच्या फोटोचे किंवा व्हिडिओचे संपादन सुरू करा.
फोनमध्ये आधीपासून असलेला फोटो किंवा व्हिडिओ वापरणे
- मजकूर लिहिण्याच्या फील्डमध्ये अटॅच करा> गॅलरीयावर टॅप करा.
- फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
- तुमच्या फोटोचे किंवा व्हिडिओचे संपादन सुरू करा.
तुमचा फोटो क्रॉप करणे किंवा फिरवणे
- वर टॅप करा.
- फोटो क्रॉप करण्यासाठी, कोणत्याही हॅंडलवर टॅप करून धरून ठेवा आणि ते तुम्हाला हव्या त्या आकारात आत किंवा बाहेर ड्रॅग करा.
- फोटो फिरवण्यासाठी, फिरवावर सतत टॅप करा.
- संपादन पूर्ण झाल्यावर पूर्ण झाले वर टॅप करा.
तुमच्या फोटोला फिल्टर लागू करणे
- फोटोवर वरच्या दिशेने स्वाइप करा.
- फिल्टर निवडा.
- पूर्ण झाल्यावर फोटोवर टॅप करा.
तुमच्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये स्टिकर्स अथवा इमोजी जोडणे
- > स्टिकर्स किंवा इमोजी वर टॅप करा.
- जे वापरायचे आहे त्यावर टॅप करा.
- इमोजी किंवा स्टिकर हलवण्यासाठी त्यावर टॅप करून धरून ठेवा व नंतर ड्रॅग करा.
- इमोजी किंवा स्टिकरचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास इमोजी किंवा स्टिकरचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
- इमोजी किंवा स्टिकर फिरवण्यासाठी, त्यावर पिंच करा आणि ते फिरवा.
- पूर्ण झाल्यावर तुमच्या फोटोवर कुठेही टॅप करा.
- इमोजी किंवा स्टिकर हटवण्यासाठी, त्याला ट्रॅश कॅनवर ड्रॅग करा.
तुमच्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये मजकूर जोडणे
- स्क्रीनवर सर्वात वर असलेल्या मजकुरावरटॅप करा.
- मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला हवा असलेला मजकूर टाइप करा.
- संपादन पूर्ण झाल्यावर पूर्ण झाले वर टॅप करा.
तुमचा मजकूर कसा दिसावा हे बदलणे
- मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या बॉक्सवर टॅप करा:
- मजकुराचा रंग बदलण्यासाठी, कलर सिलेक्टरवर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करा.
- फॉंटचा टाइप बदलण्यासाठी, वर सतत टॅप करा. प्रत्येक टॅपनिशी फॉंट बदलतो. नवीन फॉंट टाइप कन्फर्म करण्यासाठी स्क्रीनवर टॅप करा.
- मजकुराचा आकार बदलण्यासाठी दोन्ही बोटे बाहेरून आत (पिंच इन) अथवा दोन्ही बोटे आतून बाहेर (पिंच आउट) केल्यास मजकुरातील अक्षरांचा आकार लहान अथवा मोठा करता येईल.
- मजकूर फिरवण्यासाठी, मजकूर लिहिण्यासाठी असलेल्या बॉक्सवर पिंच करा आणि तो फिरवा.
- मजकूर लिहिण्यासाठी असलेला बॉक्स हलवण्यासाठी, त्याला नवीन स्थानावर ड्रॅग करा.
- पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर कुठेही टॅप करा.
टीप: तुम्ही मजकूर जोडण्याआधीही फॉंट आणि रंग निवडू शकता.
तुमच्या फोटोवर किंवा व्हिडिओवर ड्रॉ करणे
- वर टॅप करा.
- पेनचा रंग आणि जाडी निवडा.
- पेनचा रंग बदलण्यासाठी, कलर सिलेक्टरवर तुमचे बोट वर-खाली स्लाइड करा.
- तुम्ही तुमच्या फोटोखाली असलेल्या आयकॉन्सपैकी एकावर टॅप करून पेनची जाडी बदलू शकता.
- फ्रीहॅंड ड्रॉइंगसाठी तुमच्या बोटाचा वापर करा.
- ड्रॉ करताना एखादी रेघ हटवायची असल्यास पूर्ववत करावर टॅप करा.
- संपादन पूर्ण झाल्यावर पूर्ण झाले वर टॅप करा.
संपूर्ण फोटो किंवा त्याचा एखादा भाग ब्लर करणे
- वर टॅप करा.
- तुमच्या फोटोखालील ब्लरटूलवर टॅप करा.
- फोटोचा कोणताही भाग ब्लर करण्यासाठी तुमचे बोट वापरा.
- ब्लर इफेक्ट पूर्ववत करण्यासाठीवर टॅप करा.
- संपादन पूर्ण झाल्यावर पूर्ण झाले वर टॅप करा.
तुमचा व्हिडिओ म्यूट करणे
- तुमच्या व्हिडिओमधील ऑडिओ बंद करण्यासाठी म्यूट करावर टॅप करा.
तुमच्या मीडिया फाइल्स पाठवणे
तुमच्या मीडिया फाइल्स संपादित करून झाल्यावर त्या पाठवण्यासाठी
वर टॅप करा.

संबंधित लेख:
Android वर मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात