फोटो अंधूक किंवा धुरकट दिसणे
WhatsApp ला तुमच्या डिव्हाइस मध्ये किंवा SD कार्ड मध्ये जुने फोटो आढळले नाहीत तर ते अंधूक किंवा धुरकट दिसू शकतात. हे शक्यतो तेव्हा होते जेव्हा फोटो हटवला गेलेला असतो. तुमच्या डिव्हाइसमध्ये आपोआप फोटो साठवला जाण्यासाठी :
- Android : WhatsApp उघडा > टॅप करा अधिक पर्याय> सेटिंग्ज > चॅट> गॅलरीमध्ये मीडिया दाखवा हे चालू वर सेट करा.
- iPhone: WhatsApp > टॅप करा सेटिंग्ज> चॅट> कॅमेरा रोल मध्ये सेव्ह करा हे चालू वर सेट करा.
तुमच्या डिव्हाइसवर एकदा फोटो डाउनलोड झाला की तो परत डाउनलोड करता येत नाही. तो मिळवण्यासाठी तुमच्या संपर्काने तो परत पाठवावा अशी विनंती तुम्ही त्यांना करावी लागेल.
जर तुमच्याकडे Android असेल तर आम्ही असे सुचवितो की तुम्ही फोटो साठवण्यासाठी SD कार्ड वापरावे.