तुमची नोटिफिकेशन्स कशी व्यवस्थापित करावीत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
नोटिफिकेशन्सबद्दलची प्राधान्ये तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये सहज व्यवस्थापित करता येऊ शकतात. iPhone वर इनकमिंग मेसेजची सूचना मिळण्यासाठी ऑटोमेटिकली पुश नोटिफिकेशन्स येतील.
iOS वर तीन प्रकारच्या नोटिफिकेशन्स असतात :
  • Sounds : संकेत मिळताना आवाज केला जाईल.
  • Alerts/Banners : ॲलर्ट्स किंवा बॅनर्स स्क्रीनवर दिसतील.
  • Badges : ॲप्लिकेशन आयकॉनवर प्रतिमा किंवा नंबर प्रदर्शित होईल.
तुमची नोटिफिकेशन्स प्राधान्ये बदलण्यासाठी :
WhatsApp उघडा > सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर टॅप करा. मेसेज आणि ग्रुप नोटिफिकेशन्स साठी नोटिफिकेशन्स दाखवा हे चालू केले आहे ना ते तपासा.
वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट म्यूट करणे
तुम्ही ॲपसाठी व्हायब्रेशन किंवा आवाज बंद करू शकता. WhatsApp सुरु करा > सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स > इन ॲप अधिसूचना येथे जा.
नोटिफिकेशन समस्यांचे निराकरण
WhatsApp आणि iPhone सेटिंग्ज मध्ये तुम्ही नोटिफिकेशन्स सेटिंग्ज चालू केलेले आहे ना याची खात्री करून घ्या.
जर तुमची नोटिफिकेशन्स सेटिंग्ज तुम्ही तपासली असतील, आणि तरीही तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत नसतील तर तुमच्या कनेक्शन्समध्ये किंवा iOS मध्ये समस्या असू शकते.
कृपया हे लक्षात घ्या नोटिफिकेशन डिलिव्हरी ही Apple च्या पुश नोटिफिकेशन सर्व्हिस (APNS) द्वारे नियंत्रित केली जाते, आणि WhatsApp कोणत्याही प्रकारे या सर्व्हिस मधील समस्या सोडविण्यास साहाय्य करू शकत नाही. जेव्हा तुम्ही ऑफलाईन असता तेव्हा तुमच्या फोनपर्यंत संदेश पोचविण्यासाठी APNS ला संदेश पाठविला जातो. या नोटिफेकेशन्स पोहोचण्यावर वर WhatsApp चे नियंत्रण अथवा ते पाहण्याची क्षमता नाही. ही समस्या जरी WhatsApp मध्ये असली तरी त्याचे मूळ हे APNS किंवा iOS हेच असते.
साधारणपणे, ही समस्या सोडविण्याचा एकमेव उपाय म्हणजे तुमचा फोन फॅक्टरी सेटिंग वर पुनर्संचयित करणे आणि फोन नवीन असल्याप्रमाणे सेट करणे.
टीप : जर तुम्ही बॅकअप पुनर्संचयित केलात तर तुम्ही कदाचित ही समस्यादेखील पुनर्संचयित कराल. पुश नोटिफिकेशन्स येण्यासाठी वैध सिमकार्ड आणि सक्रिय वाय-फाय किंवा सेल्युलर कनेक्शन असणे गरजेचे आहे.
संबंधित लेख :
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही