तुमची नोटिफिकेशन्स कशी व्यवस्थापित करावीत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुमच्या WhatsApp सेटिंग्ज मध्ये नोटिफिकेशन्सची प्राधान्ये सहज व्यवस्थापित करता येऊ शकतात.

WhatsApp नोटिफिकेशन सेटिंग्ज बदलणे
WhatsApp उघडा > अधिक पर्याय
> सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
तुम्ही मेसेजेस, ग्रुप्स आणि कॉल्स यांसाठी पुढीलपैकी एक पर्याय निवडून नोटिफिकेशन्स बदलू शकता:
  • इनकमिंग आणि आउटगोइंग मेसेजेससाठी आवाज सुरू किंवा बंद करू शकता.
  • नोटिफिकेशन्सचा आवाज आणि रिंगटोन.
  • व्हायब्रेशनचा कालावधी.
  • Android 9 आणि त्याहून जुन्या आवृत्तीवर पॉपअप नोटिफिकेशन्स दाखवणे निवडू शकता. हे सेट केल्यास स्क्रीनच्या मध्यभागी नोटिफिकेशन्स दिसतात.
  • सपोर्ट असलेल्या फोन्समध्ये नोटिफिकेशन लाइटचा रंग काय असावा हे ठरवू शकता.
  • Android 5 आणि त्याहून नवीन आवृत्तीमध्ये उच्च प्राधान्य असलेली नोटिफिकेशन्स निवडू शकता. हे तुमच्या स्क्रीनच्या वरील भागात नोटिफिकेशन्सची झलक दाखवते आणि अशी झलक दिसणे नको असल्यास हे बंद करू शकता.
टीप: उच्च प्राधान्य असलेली नोटिफिकेशन्स बंद केल्यामुळे WhatsApp नोटिफिकेशन्स तुमच्या स्क्रीनच्या तळाशी दिसतील.
तुम्हाला तुमची नोटिफिकेशन्स सेटिंग्ज रिसेट करायची असल्यास, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स > अधिक पर्याय
> नोटिफिकेशन सेटिंग्ज रिसेट करा > रिसेट करा वर टॅप करा.
नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करणे
तुम्ही आवाज, व्हायब्रेशन, पॉपअप आणि लाइट यांसाठी वेगवेगळे पर्याय निवडून तुमची नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करू शकता:
  1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
  2. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटच्या नावावर टॅप करा.
  3. कस्टम नोटिफिकेशन्स वर टॅप करा > कस्टम नोटिफिकेशन्स वापरा हे निवडा.
टीप: ग्रुप कॉल्ससाठी डिफॉल्ट रिंगटोन वापरली जाते. ही रिंगटोन कस्टमाइझ करता येत नाही.
नोटिफिकेशन्स म्यूट करणे
  1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
  2. वैयक्तिक चॅट किंवा ग्रुप चॅटच्या नावावर टॅप करा.
  3. नोटिफिकेशन म्यूट करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा आणि ठीक आहे वर टॅप करा.
किंवा, नोटिफिकेशन्स दिसणे बंद करण्यासाठी नोटिफिकेशन्स दाखवा ची निवड रद्द करा.
संबंधित लेख:
नोटिफिकेशन्स म्यूट आणि अनम्यूट कशी करावीत: iPhone | वेब आणि डेस्कटॉप | KaiOS
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही