चॅट हटवणे

एखादे वैयक्तिक चॅट हटवणे
  1. चॅट टॅब मध्ये, तुम्हाला हटवायच्या असलेल्या चॅटवर डावीकडे स्वाइप करा.
  2. अधिक > चॅट हटवा > चॅट हटवा वर टॅप करा.
तुम्ही असेही करू शकता, चॅट टॅबच्या वर उजवीकडील कोपर्‍यामध्ये संपादित करा वर टॅप करा, तुम्हाला हटवायचे असलेले चॅट निवडा > हटवा > चॅट हटवा वर टॅप करा.
ग्रुप चॅट हटवणे
ग्रुप चॅट हटवण्यासाठी, तुम्ही सर्वप्रथम ग्रुपमधून बाहेर येणे आवश्यक आहे :
  1. चॅट टॅबमध्ये, तुम्हाला जे ग्रुप चॅट हटवायचे आहे त्यावर डावीकडे स्वाइप करा.
  2. अधिक > ग्रुपमधून बाहेर पडा > ग्रुपमधून बाहेर पडा वर टॅप करा.
  3. ग्रुप चॅटवर डावीकडे स्वाइप करा > ग्रुप हटवा > ग्रुप हटवा वर टॅप करा.
सर्व चॅट एकाचवेळी हटवणे
  1. WhatsApp मध्ये सेटिंग्ज > चॅट > सर्व चॅट हटवा येथे जा.
  2. तुमचा फोन नंबर टाका > सर्व चॅट हटवा वर टॅप करा.
वैयक्तिक चॅट तुमच्या चॅट टॅब मधून हटवले जातील. ग्रुप चॅट मात्र अजूनही तुमच्या चॅट टॅब मध्ये दिसतील आणि तुम्ही त्यातून बाहेर पडेपर्यंत त्याचा एक भाग असाल.
संबंधित लेख :
हे मदतीचे होते का?
होय
नाही