WhatsApp ची भाषा कशी बदलावी
WhatsApp हे ॲप iPhone वर ४० हून अधिक भाषांमध्ये आणि Android वर तब्बल ६० भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमचा फोन ज्या भाषेवर सेट आहे, WhatsApp त्या भाषेमध्ये दिसते. उदा. तुमच्या फोनची भाषा इंग्रजीवर सेट केलेली असेल, तर WhatsApp इंग्रजीमध्येच दिसेल.
तुमच्या फोनची भाषा बदलणे
- Android: तुमच्या फोनची सेटिंग्ज > सर्वसाधारण व्यवस्थापन > भाषा यावर जा. भाषा निवडून वरपर्यंत नेण्यासाठी त्यावर टॅप करून धरून ठेवा किंवावर टॅप करा.
- iPhone:> सर्वसामान्य > भाषा आणि प्रदेश > iPhone ची भाषा यावर जा. भाषा निवडून वरपर्यंत नेण्यासाठी त्यावर टॅप करून धरून ठेवा किंवा भाषा जोडा वर टॅप करा….
- KaiOS: ॲप्स मेनूवरील सेटिंग्ज वर प्रेस करा > पर्सनलायझेशन निवडण्यासाठी बाजूला स्क्रोल करा > खाली स्क्रोल करा आणि भाषा वर प्रेस करा > भाषा वर प्रेस करा > तुम्ही वापरू इच्छिता ती भाषा निवडा > ठीक आहे किंवा निवडा वर प्रेस करा.
पुढील पर्याय काही निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे
तुम्ही Android फोन वापरत असाल, तर तुम्ही WhatsApp मधूनही ॲपची भाषा बदलू शकाल. तुम्ही सुरुवातीच्या स्वागत स्क्रीनवर तुमची भाषा निवडू शकता किंवा तुम्ही आधीपासून WhatsApp वापरत असल्यास:
- > सेटिंग्ज > चॅट्स > ॲपची भाषा यावर टॅप करा.
- तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
तुम्हाला हे पर्याय दिसत नसल्यास तुमच्या देशामध्ये या फीचर्सना सपोर्ट नाही असे समजावे.