व्हॉइस मेसेजेस कसे पाठवावेत

WhatsApp चे व्हॉइस मेसेजिंग वापरून तुम्ही तुमच्या संपर्काशी किंवा ग्रुप्समध्ये त्वरित संवाद साधू शकता. तुम्ही महत्त्वाची आणि वेळेच्या दृष्टीने संवेदनशील अशी माहिती पोहोचवण्यासाठी व्हॉइस मेसेज वापरू शकता. बाय डिफॉल्ट, सर्व व्हॉइस मेसेजेस आपोआप डाउनलोड होतात.
व्हॉइस मेसेज पाठवणे
  1. वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.
  2. मायक्रोफोन
    वर क्लिक करा आणि बोलण्यास सुरुवात करा.
  3. बोलून झाले, की बरोबरच्या खुणेवर
    क्लिक करा.
    • व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करत असताना तो रद्द करण्यासाठी तुम्ही X चिन्हावर क्लिक करू शकता.
पाठवलेल्या व्हॉइस मेसेजेसवर तुम्हाला हे दिसेल:
  • तुमच्या प्राप्तकर्त्यांनी प्ले न केलेल्या व्हॉइस मेसेजेसवर राखाडी मायक्रोफोन
    दिसेल.
  • तुमच्या प्राप्तकर्त्यांनी प्ले केलेल्या व्हॉइस मेसेजेसवर निळा मायक्रोफोन
    दिसेल.
संबंधित लेख:
हे मदतीचे होते का?
होय
नाही