ग्रुपमध्ये सदस्य कसे जोडावेत आणि ग्रुपमधून सदस्य कसे काढावेत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
जर तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर तुम्ही ग्रुपमध्ये सदस्य जोडू किंवा काढू शकता.
सदस्य जोडणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती वर टॅप करा.
 2. सदस्य जोडा
  वर टॅप करा.
 3. तुम्हाला ज्यांना ग्रुपमध्ये समाविष्ट करायचे आहे, ते संपर्क शोधा किंवा निवडा.
 4. जोडा > जोडा यावर टॅप करा.
सदस्यांना काढणे
 1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  • किंवा, चॅट टॅबवरील ग्रुपला डावीकडे स्वाइप करा. त्यानंतर, अधिक > ग्रुपची माहिती यावर टॅप करा.
 2. ज्या सदस्याला हटवायचे आहे त्यांच्या नावावर टॅप करा.
 3. ग्रुपमधून काढून टाका > काढून टाका वर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही