इतर ॲप्स वर WhatsApp स्टेटस अपडेट्स शेअर कसे करावे

Android आणि iPhone वर, Facebook Stories आणि इतर ॲप्स वर तुम्हाला तुमचे WhatsApp स्टेटस अपडेट शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. स्टेटस गोपनीयतेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
तुमचे स्टेटस अपडेट Facebook Stories वर शेअर करण्यासाठी
 1. WhatsApp उघडा.
 2. स्टेटस वर टॅप करा.
 3. या प्लॅटफॉर्म्स वर स्टेटस अपडेट तयार करण्यासाठी : Android | iPhone
 4. तुम्हाला नवीन स्टेटस अपडेट शेअर करायचे आहे की जुने या नुसार तुमच्या कडे शेअर करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील :
  • नवीन स्टेटस अपडेट शेअर करणे : माझे स्टेटस खाली असणाऱ्या Facebook Story वर शेअर करा वर टॅप करा. जर विचारण्यात आले तर अनुमती द्या किंवा Facebook ॲप उघडण्यासाठी चालू करा वर टॅप करा. Facebook ॲप मध्ये तुम्हाला ज्या लोकांशी शेअर करायचे आहे ते निवडा आणि आता सामायिक करा वर टॅप करा. कृपया हे लक्षात घ्या की एकदा तुम्ही दुसऱ्या टॅब वर गेलात, की Facebook Story वर शेअर करा हा पर्याय दिसणार नाही.
  • जुने स्टेटस अपडेट शेअर करणे : iPhone वर माझे स्टेटस वर टॅप करा किंवा Android वर माझे स्टेटस जवळील अधिक
   वर टॅप करा. नंतर, तुम्हाला जे स्टेटस अपडेट शेअर करायचे आहे त्या समोरील अधिक (
   किंवा
   ) वर जा आणि Facebook वर शेअर करा वर टॅप करा. जर विचारण्यात आले तर अनुमती द्या किंवा Facebook ॲप उघडण्यासाठी चालू करा वर टॅप करा. Facebook ॲप मध्ये तुम्हाला ज्या लोकांशी शेअर करायचे आहे ते निवडा आणि आता सामायिक करा वर टॅप करा.
 5. तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट शेअर करून झाले की परत WhatsApp उघडले जाईल.
टीप :
 • जर तुमच्याकडे अनेक स्टेटस अपडेट असतील तर तुम्हाला कोणते स्टेटस अपडेट Facebook Stories वर शेअर करायचे आहेत ते तुम्ही निवडू शकता.
 • हे फीचर तेव्हाच उपलब्ध असेल जेव्हा तुमच्या डिव्हाइस वर खालील पैकी एखादे ॲप इंस्टॉल केलेले असणे गरजेचे आहे : Android वरचे Facebook, Android वरचे Facebook Lite किंवा iOS वरचे Facebook.
तुमचे स्टेटस अपडेट इतर ॲप्स वर शेअर करण्यासाठी
 1. WhatsApp उघडा.
 2. स्टेटस वर टॅप करा.
 3. या प्लॅटफॉर्म्स वर स्टेटस अपडेट तयार करण्यासाठी : Android | iPhone
 4. तुम्हाला नवीन स्टेटस अपडेट शेअर करायचे आहे की जुने या नुसार तुमच्या कडे शेअर करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील :
  • नवीन स्टेटस अपडेट शेअर करणे : माझे स्टेटस खाली जा, आणि शेअर (
   किंवा
   ) या चिन्हावर टॅप करा. कृपया हे लक्षात घ्या की एकदा तुम्ही दुसऱ्या टॅब वर गेलात की शेअर करा हा पर्याय दिसणार नाही.
  • जुने स्टेटस अपडेट शेअर करणे : iPhone वर माझे स्टेटस वर टॅप करा किंवा Android वर माझे स्टेटस जवळील अधिक
   वर टॅप करा. नंतर, तुम्हाला जे स्टेटस अपडेट शेअर करायचे आहे त्या समोरील अधिक (
   किंवा
   ) चिन्हावर जा आणि शेअर करा वर टॅप करा.
 5. शेअर ट्रे मध्ये तुम्हाला ज्या ॲप वर स्टेटस अपडेट शेअर करायचे आहे त्या ॲप वर टॅप करा.
माहिती स्रोत
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही