WhatsApp Business खाते Facebook पेजला कसे जोडावे

WhatsApp Business खाते वापरत असताना तुम्ही तुमचे Facebook पेज तुमच्या WhatsApp Business खात्याला लिंक करू शकता.
बिझनेसशी संबंधित टीप: तुमचे WhatsApp खाते तुमच्या Facebook पेजला लिंक केल्यामुळे, तुमच्या Facebook पेजला भेट देणारे ग्राहक फक्त एकदा क्लिक करून तुम्हाला थेट WhatsApp वर मेसेज करू शकतात.
ही खाती लिंक करण्यासाठी आणि सिंक करणे सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
 • तुमच्या बिझनेससाठी सुरू केलेले Facebook पेज.
 • WhatsApp Business ॲपवरील खाते.
 • मोबाइल ॲप्सची नवीनतम आवृत्ती.
WhatsApp Business खाते Facebook पेजला लिंक करणे
तुम्ही WhatsApp Business ॲपमधून तुमची खाती लिंक करू शकता.
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. Android वर आणखी पर्याय वर टॅप करा. iPhone मधील सेटिंग्ज वर टॅप करा.
 3. बिझनेस टूल्स > Facebook आणि Instagram यावर टॅप करा.
 4. Facebook > पुढे सुरू ठेवा यावर टॅप करा. यामुळे Facebook लॉगिन पेज उघडेल.
 5. तुमच्या Facebook खात्याची लॉगिन माहिती एंटर करा. लॉग इन करा वर टॅप करा.
 6. तुमच्या WhatsApp Business खात्याला लिंक करायचे आहे ते Facebook पेज निवडा. WhatsApp कनेक्ट करा वर टॅप करा.
  • तुमचे Facebook पेज नसेल, तर ते तयार करण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल.
तुम्हाला आता तुमच्या Facebook पेजवर WhatsApp बटण दिसेल.
तुम्ही WhatsApp Business ॲपवर परत आल्यानंतर, तुम्हाला तुमचे लिंक केलेले Facebook पेज Facebook आणि Instagram स्क्रीनच्या सर्वात वर दिसेल.
तुमची Facebook आणि WhatsApp Business माहिती सिंक करणे
तुम्ही तुमची खाती सिंक करता, तेव्हा तुमच्या Facebook पेजवर तुमच्या बिझनेस माहितीमध्ये केलेले कोणतेही बदल आपोआप तुमच्या WhatsApp बिझनेस प्रोफाइलवर दिसतील.
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. Android वर आणखी पर्याय वर टॅप करा. iPhone मधील सेटिंग्ज वर टॅप करा.
 3. बिझनेस टूल्स > Facebook आणि Instagram यावर टॅप करा.
 4. WhatsApp Business ॲपशी सिंक करायचे आहे त्या Facebook खात्यावर टॅप करा.
 5. Facebook पेजसह प्रोफाइल सिंक करा वर जाऊन सुरू करा हे सुरू करा. iPhone वर, पेजसह प्रोफाइल सिंक करा हे सुरू करा.
सिंक करणे हे एकीकडूनच शक्य आहे—तुमच्या Facebook पेजकडून WhatsApp Business ॲपला होणारे सिंक. उदाहरणार्थ, तुम्ही WhatsApp Business वर बिझनेस वेळापत्रक बदलले, तर सिंक होणे बंद होईल असा चेतावणी मेसेज तुम्हाला येईल. तुम्ही तुमचे बिझनेस वेळापत्रक संपादित करणे पुढे सुरू ठेवले, तर तुमच्या WhatsApp Business खात्यावर नवीन वेळापत्रक दिसेल आणि तुमच्या Facebook पेजवर जुने वेळापत्रक दिसेल.
टीप: सिंक सुरू केल्यावर ते वेब आणि मोबाइल या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालते.
तुमचे लिंक केलेले Facebook खाते WhatsApp Business ॲपमधून काढणे
तुम्हाला यापुढे तुमची खाती कनेक्ट करायची नसतील, तर तुम्ही तुमच्या WhatsApp Business ॲपमधून तुमच्या Facebook आणि WhatsApp खात्यांची लिंक काढून टाकू शकता.
 1. WhatsApp Business ॲप उघडा.
 2. Android वर आणखी पर्याय वर टॅप करा. iPhone मधील सेटिंग्ज वर टॅप करा.
 3. बिझनेस टूल्स > Facebook आणि Instagram यावर टॅप करा.
 4. तुमच्या लिंक केलेल्या Facebook खात्यावर टॅप करा > WhatsApp काढा > काढा यावर टॅप करा.
तुमचे खाते काढल्यानंतर ते Facebook आणि Instagram स्क्रीनवर दिसणार नाही.
संबंधित लेख:
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही