ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट किंवा अनम्यूट कशी करावीत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही काही ठरावीक काळासाठी ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करू शकता. ग्रुपमध्ये पाठवलेले मेसेजेस तुम्हाला मिळत राहतील पण, ते मेसेजेस जेव्हा येतील तेव्हा फोन व्हायब्रेट होणार नाही किंवा आवाज होणार नाही.
ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
  2. पर्याय > म्यूट करा > ठीक आहे वर प्रेस करा.
  3. तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा.
  4. ठीक आहे वर प्रेस करा.
किंवा, ग्रुप चॅट उघडा. पर्याय > ग्रुप माहिती > नोटिफिकेशन्स म्यूट करा यावर प्रेस करा. तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा, त्यानंतर ठीक आहे वर प्रेस करा.
ग्रुप नोटिफिकेशन्स अनम्यूट करणे
  1. WhatsApp ग्रुप चॅट उघडा.
  2. पर्याय > अनम्यूट करा > ठीक आहे वर प्रेस करा.
किंवा, ग्रुप चॅट उघडा. पर्याय > ग्रुप माहिती > नोटिफिकेशन्स म्यूट करा > एकही नाही यावर प्रेस करा.
टीप: तुम्ही चॅटसाठी मेसेज नोटिफिकेशन्स बंद करता, तेव्हा तुमचे डिव्हाइस तुम्हाला इनकमिंग नोटिफिकेशन्सबाबत सूचित करणार नाही. तरीही, पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
  • तुम्ही संपर्कांना म्यूट केले आहे हे त्यांना सूचित केले जात नाही.
  • तुम्ही संपर्कांचे मेसेजेस वाचता, तेव्हा त्यांना वाचल्याची पोचपावती मिळत राहील.
  • तुम्हाला चॅटच्या बाजूला न वाचलेल्या मेसेजेसची संख्या दिसत राहील.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही