ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट किंवा अनम्यूट कशी करावीत

Android
iPhone
KaiOS
वेब आणि डेस्कटॉप
Windows
तुम्ही काही ठरावीक काळासाठी ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करू शकता. ग्रुपमध्ये पाठवलेले मेसेजेस तुम्हाला मिळत राहतील पण, ते मेसेजेस जेव्हा येतील तेव्हा फोन व्हायब्रेट होणार नाही किंवा आवाज होणार नाही.
ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करणे
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, सर्वात वरच्या कोपऱ्यातील नोटिफिकेशन्स म्यूट करा या चिन्हावर टॅप करा.
  2. म्यूट करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला किती कालावधीसाठी नोटिफिकेशन्स म्यूट करायची आहेत ते निवडा.
    • तुम्ही नोटिफिकेशन्स दाखवा ची निवड रद्द करूनही तुमच्या नोटिफिकेशन्स स्क्रीनवर नोटिफिकेशन्स दिसणे बंद करू शकता.
  4. ठीक आहे वर टॅप करा.
ग्रुप नोटिफिकेशन्स अनम्यूट करणे
  1. WhatsApp ग्रुप चॅटवर जा आणि त्यानंतर ग्रुपच्या नावावर टॅप करा.
  2. नोटिफिकेशन्स अनम्यूट करा वर टॅप करा.
    • किंवा, चॅट टॅबमध्ये ग्रुपवर टॅप करून धरून ठेवा. त्यानंतर, सर्वात वरच्या कोपऱ्यातील नोटिफिकेशन्स अनम्यूट करा या चिन्हावर टॅप करा.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही