कॉल वेटिंग कसे वापरायचे

Android
iPhone
तुमचा WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल सुरू असताना दुसरा एखादा WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल येत असल्यास, कोणता कॉल आहे त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यानंतर तुम्ही तो कॉल स्वीकारायचा की नाकारायचा हे निवडू शकता. यामुळे तुमच्या सुरू असलेल्या कॉलमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
एखाद्या व्यक्तीने तुम्हाला WhatsApp वर कॉल केल्यास
तुम्ही पुढील पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता:
  • सुरू असलेला कॉल बंद करा व येणारा कॉल स्वीकारा: तुम्ही सध्या ज्या कॉलवर आहात तो कॉल बंद करा आणि येणारा नवीन कॉल स्वीकारा.
  • नकार द्या: येणाऱ्या नवीन कॉलला नकार द्या आणि सध्याचा कॉल सुरू ठेवा.
तुम्हाला WhatsApp ऐवजी इतर माध्यमांद्वारे कॉल येत असल्यास
तुम्ही WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलवर असताना तुम्हाला लँडलाईन किंवा WhatsApp वर नसलेल्या मोबाइल नंबरवरून कॉल येत असल्यास, तुम्ही पुढीलपैकी एका पर्यायावर टॅप करू शकता:
  • सुरू असलेला कॉल बंद करा व येणारा कॉल स्वीकारा: तुम्ही सध्या ज्या कॉलवर आहात तो कॉल बंद करा आणि येणारा नवीन कॉल स्वीकारा.
  • नकार द्या: येणाऱ्या नवीन कॉलला नकार द्या आणि सध्याचा कॉल सुरू ठेवा.
टीप:
  • WhatsApp व्यतिरिक्त इतर माध्यमांद्वारे आलेल्या कॉल्सचे शुल्क तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरवर अवलंबून असते. तुम्ही रोमिंगमध्ये असताना मोबाइल इंटरनेट वापरत असल्यास किंवा तुमचे डेटा लिमिट संपल्यास, तुम्ही WhatsApp वरून केलेले व्हॉइस कॉल्स किंवा व्हिडिओ कॉल्स यांसाठी शुल्क आकारले जाऊ शकते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही