कॉल वेटिंग कसे वापरायचे

Android
iPhone
तुम्ही WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलवर असताना एखाद्या व्यक्तीने तुम्हाला WhatsApp वर कॉल केल्यास, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही कॉल घेण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमच्या सुरू असलेल्या कॉलमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
तुम्ही सेटिंग्जमध्ये अज्ञात कॉलर्सचे कॉल्स सायलंट करण्याचा पर्यायदेखील निवडू शकता. तुम्हाला त्यानंतरही कॉल्स टॅबमध्ये आणि नोटिफिकेशन्समध्ये अज्ञात कॉलर्सकडून आलेले सायलंट केलेले कॉल्स दिसतील, पण तुमचा फोन वाजणार नाही.
एखाद्या व्यक्तीने तुम्हाला WhatsApp वर कॉल केल्यास
त्यानंतर तुम्ही हे करू शकता:
  • समाप्त करा आणि स्वीकारा: तुम्ही सध्या ज्या कॉलवर आहात तो समाप्त करा आणि इनकमिंग कॉल स्वीकारा, किंवा
  • नकार द्या: इनकमिंग कॉलला नकार द्या आणि विद्यमान कॉलवर रहा.
तुम्हाला WhatsApp ऐवजी इतर माध्यमांद्वारे कॉल येत असल्यास
तुमच्या WhatsApp व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलदरम्यान WhatsApp च्या बाहेरचे कोणीतरी कॉल करत असल्यास, तुम्ही पुढील पर्यायांवर टॅप करू शकता:
  • समाप्त करा आणि स्वीकारा: तुम्ही सध्या ज्या कॉलवर आहात तो संपवा आणि इनकमिंग कॉल स्वीकारा.
  • नकार द्या: इनकमिंग कॉलला नकार द्या आणि विद्यमान कॉलवर रहा.
टीप:
  • WhatsApp च्या बाहेरून केलेल्या कॉल्सवर मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरचे शुल्क लागू होऊ शकते.
  • रोमिंगमध्ये असताना किंवा तुम्ही तुमची डेटा मर्यादा ओलांडल्यास WhatsApp व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठीही शुल्क लागू होऊ शकते.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले?
होय
नाही