बॅकअप हटवणे
खालील सूचनांचे पालन करून तुम्ही तुमचे WhatsApp बॅकअप्स हटवू शकता.
सुरुवात करण्याआधी कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या :
- तुमचे पूर्वीचे चॅट हे बॅकअप फाइल्सच्या स्वरुपात
/sdcard/WhatsApp/Databases/
या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले असते. - तुम्ही ही फोल्डर्स WhatsApp च्या बाहेर उघडू शकत नाही.
- या फाइल्स हटवण्यासाठी फाइल मॅनेजर लागेल.
बॅकअप हटवण्यासाठी :
- फाइल मॅनेजर उघडा.
- WhatsApp फोल्डरवर टॅप करा. तुम्हाला WhatsApp सब-फोल्डर्सची सूची दिसायला लागेल.
- Databases फाइलवर टॅप करून धरून ठेवा.
- हटवा हा पर्याय निवडा.